मोदींच्या उपस्थितीतच नरेंद्र मोदी स्टेडियमने रचला इतिहास; कसोटी क्रिकेटमध्ये आता... | Ahmedabad Test Attendance Record | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmedabad Test Attendance Record

Ahmedabad Test Attendance Record : मोदींच्या उपस्थितीतच नरेंद्र मोदी स्टेडियमने रचला इतिहास; कसोटी क्रिकेटमध्ये आता...

Ahmedabad Test Attendance Record : बॉर्डर - गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेती भारत आणि ऑस्ट्रेलिया याच्यातील चौथ्या कसोटीचा पहिला दिवस अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरला. पहिल्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानीज यांनी स्टेडियममध्ये उपस्थिती लावली. या दोघांनी पहिल्या दिवसाचा खेळ काही काळ पाहिला.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अहदमाबाद कसोटीच्या पहिल्या दिवशी स्टेडियममध्ये उपस्थित राहणार म्हटल्यावर नरेंद्र मोदी स्टेडियमवर चाहत्यांची तुडूंब गर्दी झाली होती. याच गर्दीने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडचा 2013 चा अॅशेस कसोटीदरम्यान झालेला विक्रम मोडीत काढला. पहिल्या दिवशी सर्वाधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीचे रेकॉर्ड हे आता अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियमच्या नावे झाले आहे.

आजच्या पहिल्या दिवशी अहमदाबाद कसोटी पाहण्यासाठी 1 लाख लोक नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित होते. यापूर्वी हे रेकॉर्ड एमसीजीच्या नावावर होते. 2013 च्या अॅशेस मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी एमसीजीवर 91 हजार 092 प्रेक्षक उपस्थित होते.