
हार्दिक पांड्या स्वार्थी, GT ला टाकले अडचणीत; माजी क्रिकेटपटूचा आरोप
हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) पॉईंट टेबलमध्ये पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. लखनौ सुपर जायंट्सवर (Lucknow Super Giants) धमकदार विजय मिळवून गुजरातच्या संघाने 18 गुण मिळवले आहेत आणि यासह आयपीएल 2022 च्या प्लेऑफसाठी (IPL Playoofs) पात्र ठरणार पहिला संघ बनला आहे. मात्र, संघासाठी खळबळ माजवणारी माहिती समोर आले आहे. माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने हार्दिक पांड्याला स्वार्थी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर त्याच्यावर गंभीर आरोपदेखील केला आहे.
क्रिकबजशी बोलताना अजय जडेजाने हार्दिक पांड्यावर भाष्य केले. पांड्याच्या प्रकृतीला तो स्वतः जबाबदार आहे. पांड्या अद्यापही पुर्णपणे फिट नाही. सुरुवातीला काही मॅचमध्ये गोलंदाजी केली. मात्र, त्यानंतर काही सामन्याता त्याला नीट धावता आले नाही.
हेही वाचा: कॅप्टन हार्दिक पांड्या म्हणतो, सगळ्या गोष्टी माझ्या हातात नाहीत
जडेजा म्हणाले, सर्वांना माहिती आहे की तो जायबंदी होता आणि तो परतत होता. त्याने 140 किमी. प्रति तास वेगाने गोलंदाजी केली आहे. कदाचीत संघाचा याची गरज नव्हती. मात्र, दिखावा करण्यासाठी तो मैदानात उतरला आहे. स्वतःवर झालेल्या आरोपांना धुडकावून लावण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने स्वतःच्या शरिरावर विनाकारण ताण दिला आहे. त्यामुळे तो नीट धावू शकत नसल्याचे जडेजाने म्हटले आहे.
तसेच, तो सध्या त्या वाटेवर ज्या वाटेवर तो शिकत आहे. एक खेळाडू हळू हळू प्रत्येक टप्पा ओलांडतो आणि पुन्हा अपरिपक्वता दाखवतो. पांड्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी 14 मॅच होत्या मात्र, तो मी फिट असल्याचे दाखवून देण्याची घाई केली आहे. त्याची ही अतिघाई गुजरात टायटन्सला महागात पडत आहे. अशी खंत व्यक्त करत आरोप केला आहे.
हेही वाचा: पांड्या यो यो टेस्ट पास; गोलंदाजी वेळी 135 kmph वेगाने फेकले चेंडू
स्वतःच्या शरिराला जाणून घेतले पाहिजे. तुम्ही दुसऱ्यांसारखं काम करु शकत नाही. हार्दिक पांड्या नक्कीच अपरिपक्व आहे. असे मत जडेजाने यावेळी व्यक्त केले.
गेल्या काही पाच मॅचमध्ये हार्दिकची कामगिरी फ्लॉप ठरली आहे. लगातार तीन अर्धशतक ठोकणारा पांड्या गेल्या पाच मॅचमध्ये केवळ 49 रन केल्या आहेत.
Web Title: Ajay Jadeja Sayes Hardik Pandya Tried To Show Off In The Beginning His Immaturity Cost Him As Well As Gujarat Titans
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..