
रहाणे-पुजारा जोडीचा दर्जा घसरला; पांड्यासह साहाला BCCI चा दणका
नवी दिल्ली : बीसीसीआयने २०२१-२२ या वर्षासाठी सेंट्रल काँट्रॅक्ट मिळालेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. हार्दिक पांड्यासह ४ मोठ्या खेळाडूंना यामध्ये फटका बसला आहे. यात त्यांची ग्रेड कमी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून खराब कामगिरी करणाऱ्या रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला लंकेविरुद्धच्या संघात संधी मिळाली नव्हती. तर यष्टीरक्षक फलंदाज ऋद्धिमान साहालासुद्धा संघात जागा मिळवता आली नव्हती. या चौघांचा समावेश बी ग्रेडमध्ये करण्यात आला आहे.
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेसुद्धा सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहेत. हे दोघेही याआधी ए ग्रेडमध्ये होते. तर हार्दिक पांड्याला मोठा दणका बसला असून तो ए ग्रेडमधून थेट सी ग्रेडमध्ये गेला आहे. तर ऋद्धिमान साहाचा बी ग्रेडमधून सी ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान BCCI ने त्यांच्या खेळाची वार्षिक कामगिरी पाहून त्यांचा खालच्या ग्रेडमध्ये सामावेश करण्यात आला आहे असं सांगितलं. वृद्धिमान साहाला सुद्धा बी ग्रेडमधून सी ग्रेडमध्ये टाकण्यासाठी याच निकषांवर आधार घेतला असल्याचं BCCI नं सांगितलं.
यानंतर आता हार्दिक पांड्या,अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि वृद्धिमान साहा या चारही खेळाडूंना दणका बसला आहे.
Web Title: Ajinkya Rahane Cheteshwar Pujara Decreases Grade From A To B
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..