Ajinkya Rahane : शेष भारत संघाकरिता रहाणेचा विचार नाही

इराणी सामन्यासाठी हनुमा विहारी शेष भारताचा कर्णधार
Ajinkya Rahane
Ajinkya Rahaneesakal

मुंबई : भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवायचे असेल तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळावे अशी सूचना चेतेश्वर पुजारासह अजिंक्य रहाणेला करण्यात आली होती, परंतु इराणी सामन्यासाठी शेष भारत संघाकरिता रहाणेचा विचार झाला नाही. हनुमा विहारी या संघाचे नेतृत्व करणार आहे.

२०१९ चे रणजी विजेते सौराष्ट्र यांच्याविरुद्धचा हा इराणी सामना १ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. निवड समितीने नवोदित खेळाडूंवर भर देत त्यांना शेष भारत संघात स्थान दिले; मात्र हनुमा विहारीवर विश्वास कायम ठेवला.

अभिमन्यू र्इश्वरन, प्रियांक पांचाळ, मयांक अगरवाल आणि सर्फराझ खान, यश धुल आणि यशस्वी जयस्वाल असे फलंदाज निवडताना रहाणेचा विचार झाला नाही. मुळात रहाणे नुकत्याच झालेल्या दुलीप करंडक स्पर्धेतील सामन्यात अपयशी ठरला. दुबळ्या र्इशान्य भारत संघाविरुद्ध त्याने द्विशतक केले; मात्र उपांत्य आणि अंतिम सामन्यात तुल्यबळ प्रतिस्पर्धी समोर असताना रहाणे पूर्णपणे अपयशी ठरला होता. याच वेळी न्यूझीलंड अ संघाविरुद्ध भारत अ संघातून खेळताना प्रभाव पाडणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

शेष भारत संघ : हनुमा विहारी (कर्णधार), अभिमन्यू र्इश्वरन, प्रियांक पांचाळ, सर्फराझ खान, मयांक अगरवाल, यश धुल, यशस्वी जयस्वाल, उपेंद्र यादव, केएस भरत (यष्टिरक्षक), कुलदीप सेन, उमरान मलिक, मुकेश कुमार, अर्झान नागवासवाला, जयंत यादव आणि सौरभ कुमार.

पुजाराला संधी

२०१९ मध्ये सौराष्टने रणजी विजेतेपद मिळवले होते, त्यामुळे आता इराणी सामन्यात खेळताना पुजाराने निवड समितीचे लक्ष वेधून घेण्याची संधी मिळणार आहे, परंतु भारतीय संघ एवढ्यात कसोटी सामने खेळणार नाही. ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात कसोटी मालिका खेळण्यास येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com