Ajinkya Rahane WI vs IND : या वयात म्हणजे.. 'पत्रकार' रोहितने रहाणेची घेतली फिरकी

Ajinkya Rahane Rohit Sharma WI vs IND
Ajinkya Rahane Rohit Sharma WI vs IND esakal
Updated on

Ajinkya Rahane WI vs IND : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिका उद्या (दि. 12) सुरू होत आहे. डोमिनिका येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघाने जोरदार सराव केला. दरम्यान, सामन्याच्या पूर्वसंध्येला आज पत्रकार परिषदेला भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे उपस्थित होता. यावेळी कर्णधार रोहित शर्मा देखील तेथे उपस्थितीत होता.

रोहित शर्माने देखील अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) पत्रकारांसारखे प्रश्न विचारात त्याची फिरकी घेतली. दरम्यान, एका वरिष्ठ पत्रकाराने अजिंक्य रहाणेला प्रश्न विचारताना या वयात असा उल्लेख केला. यावेळी अजिंक्यने त्यांना मधेच थांबवत मी अजून तरूण असल्याचे सांगितले. या उत्तरावर रोहित शर्मा हसू लागला.

Ajinkya Rahane Rohit Sharma WI vs IND
MS Dhoni : 'तो एखाद्या ड्रग्जसारखा...', धोनीने चेन्नईच्या सहकारी खेळाडूबद्दल सांगितली गुपीतं

पत्रकार रोहित शर्मा

रोहित शर्माने (Rohit Sharma News) लगेच पत्रकार परिषद (Press Conference) आपल्या हातात घेत रहाणेला प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. रोहितने विचारले की, तू वेस्ट इंडीजमध्ये बऱ्याचदा आला आहेत. या खेळपट्टीवर खेळण्याचा तुझ्याकडे चांगला अनुभव आहे. तू इथे खूप धावा देखील केल्या आहेस. संघातील नव्या खेळाडूंना तू काय सांगू इच्छितोस?

यावर अजिंक्य रहाणे म्हणाला की, 'वेस्ट इंडीजमध्ये खेळताना माझा त्यांना एकच सल्ला असेल की एक फलंदाज म्हणून तुम्हाला इथं खेळताना खूप संयम दाखवावा लागतो.'

वेस्ट इंडीजमधील वातावरण खूपच खुले आहे. अशा परिस्थितीत क्रिकेटरला आपल्या कामावर फोकस करणे किती गरजेचे आहे असा प्रश्न रोहित शर्माने विचारला. या प्रश्नाचे अजिंक्य रहाणे उत्तर देणार इतक्यात पावसाने सुरूवात केली. यामुळे रहाणे आणि रोहित शर्मासह इतर पत्रकारांना देखील पॅव्हेलियनकडे धाव घ्यावी लागली.

Ajinkya Rahane Rohit Sharma WI vs IND
Brij Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहला होणार 5 वर्षांचा तुरुंगवास? पोलिसांच्या आरोपपत्रात अनेक धक्कादायक खुलासे

भारत WTC 2023 - 25 Cycle विंडीज दौऱ्यापासून करणार सुरू

भारत वेस्ट इंडीजमधील दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळून WTC 2023 - 25 Cycle ची सुरूवात करणार आहे. गेल्या दोन सर्कलमध्ये भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र दोन्ही WTC Final मध्ये भारताच्या पदरी निराशाच पडली.

भारतासाठी वेस्ट इंडीजचे आव्हान हे सोपे आव्हान मानले जात आहे. मात्र रोहित शर्मा वेस्ट इंडीजला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.