Ajinkya Rahane : 'कठीण काळात मला...' १८ ते १९ महिन्यांनंतर टीम इंडियात पुनरागमन करताना रहाणे झाला भावूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 ajinkya rahane-says-about-come-back-in-team-india

Ajinkya Rahane : 'कठीण काळात मला...' १८ ते १९ महिन्यांनंतर टीम इंडियात पुनरागमन करताना रहाणे झाला भावूक

Ajinkya Rahane Comeback Team India WTC 2023 : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळल्या जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघ इंग्लंडमध्ये पोहोचले आहेत.

आयपीएलचा 16वा सीझन संपल्यानंतर आता या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तब्बल 18 ते 19 महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या कामगिरीवरही सर्वांची नजर असेल. रहाणे आयपीएलच्या 16 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा एक भाग होता, ज्यामध्ये त्याने संघासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती.

पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर बाहेर पडल्यानंतर अनुभवाच्या आधारे अजिंक्य रहाणेचा WTC सामन्यासाठी टीम इंडियात समावेश करण्यात आला. आता भारतीय संघात दाखल झाल्यानंतर रहाणेने पुनरागमन केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. रहाणे म्हणाला की, इतक्या दिवसांनी पुनरागमन करणे हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे.

अजिंक्य रहाणेने बीसीसीआयने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, टीम इंडियामध्ये पुन्हा परतणे हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. या कठीण काळात माझ्या कुटुंबाने मला पूर्ण साथ दिली. आजही भारतासाठी खेळण्याचे माझे स्वप्न आहे.

दुसरीकडे रहाणेने रोहितच्या कर्णधारपदाबद्दल सांगितले की, आतापर्यंत रोहितने संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली आहे. प्रत्येकजण योगदान देत आहे आणि आम्ही सर्व फॉरमॅटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आहोत. रोहित आणि राहुल भाई संघाला उत्तम प्रकारे सांभाळत आहेत.