IND vs AUS WTC Final : कमिन्सच्या चुकीकडे थर्ड अंपायरचे दुर्लक्ष?, अजिंक्य रहाणेच्या विकेटवरून झाला ड्रामा

IND vs AUS WTC Final Ajinkya Rahane
IND vs AUS WTC Final Ajinkya Rahanesakal

IND vs AUS WTC Final Ajinkya Rahane : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा दुसरा दिवसही कांगारूंच्या नावावर राहिला. पहिल्या डावात 469 धावा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची अवस्था 5 बाद 151 अशी केली असून भारत अजूनही 318 धावांनी पिछाडीवर आहे.

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने मोठी चूक केली नसती तर भारताच्या या 5 विकेट 6 किंवा 7 असू शकतात. दुसऱ्या दिवशी पॅट कमिन्सच्या चुकीमुळे अजिंक्य रहाणेला जीवदान मिळाले, तर ऑस्ट्रेलियाचे मोठे नुकसान झाले.

IND vs AUS WTC Final Ajinkya Rahane
Ind vs Aus WTC 2023 Final: भारतीय फलंदाजांकडूनही निराशा! कांगारूंची ४६९ पर्यंत मजल, तर टीम इंडिया ५ बाद १५१

तब्बल 18-19 महिन्यांनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेचे नशीब त्याला WTC अंतिम सामन्यातही साथ देत असल्याचे दिसून आले. या सामन्यात रहाणे फलंदाजी करत असताना पॅट कमिन्सच्या एका चेंडूवर अंपायरने त्याला आऊट दिले. मात्र रहाणेच्या नशिबाने साथ दिली आणि तो नाबाद राहिला.

भारतीय संघाच्या पहिल्या डावातील 22 व्या षटकात कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्सकडून रहाणेचा एक चेंडू हुकला. दरम्यान चेंडू थेट पॅडवर आदळला आणि अंपायरने लगेच बोट वर करून रहाणेला आऊट दिला. रहाणेनेही जडेजाशी बोलून डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला.

IND vs AUS WTC Final Ajinkya Rahane
Shubman Gill : IPL चे मैदान गाजवलेला शुभमन गिल WTC फायनलमध्ये फक्त 13 धावांवर क्लिन बोल्ड - Video

रहाणेने रिव्ह्यूची मागणी करताच थर्ड अंपायरला प्रथम पॅट कमिन्सचा नो बॉल पाहिला. कमिन्सचा पाय एका कोनातून पूर्णपणे दिसत नव्हता, तर दुसऱ्या कोनातून दृश्य स्पष्ट नव्हते. अशा स्थितीत कमिन्सच्या पायाचे बारकाईने निरीक्षण केल्यावर तिसऱ्या पंचांना त्याच्या पायाचा कोणताही भाग रेषेच्या आत नसल्याचे आढळून आले. कमिन्सच्या या नो बॉलमुळे रहाणेला जीवदान मिळाले. रहाणे तिथून बाद झाला असता तर भारतासाठी मोठा धक्का बसला असता.

IND vs AUS WTC Final Ajinkya Rahane
WTC Final 2023 Day 2 : गोलंदाज सुधारले, फलंदाज चुकले; कमिन्सचा स्मार्टपणा अन् कांगारू फायद्यात

ही थर्ड अंपायरची मोठी चूकही म्हणता येईल. वास्तविक आता ऑनफिल्ड अंपायरला पायाचा नो बॉल दिसत नाही. हे तिसऱ्या पंचाचे काम आहे. रहाणे बाद झाल्यावर तिसऱ्या पंचाने रिव्ह्यू घेण्यापूर्वी त्याला नो बॉल म्हणायला हवे होते, पण तसे झाले नाही.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने पहिल्या डावात 151 धावा होईपर्यंत 5 विकेट गमावल्या होत्या. तरीही टीम इंडिया या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा 318 धावांनी मागे आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा अजिंक्य रहाणे 71 चेंडूत 29 धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. फलंदाजी करताना रहाणेच्या अंगठ्यालाही दुखापत झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com