शेतकऱ्यांचे सारे कष्ट एका रात्रीत वाया गेल्याने मन तुटतंय : अजिंक्य रहाणे

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

पुण्यासह महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. आधी सांगली, कोल्हापूर, नाशिक तर आता पुणे, बारामतीसारख्या ठिकाणी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे याने महाराष्ट्रातील नागरिकांना पाठींबा देणारे ट्विट केले आहे. 

मुंबई : पुण्यासह महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. आधी सांगली, कोल्हापूर, नाशिक तर आता पुणे, बारामतीसारख्या ठिकाणी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे याने महाराष्ट्रातील नागरिकांना पाठींबा देणारे ट्विट केले आहे. 

चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सुटला; आपला ट्वेंटी20 किंग कमबॅक करतोय!

महाराष्ट्रासह भारतभर अशा अवकाळी आणि धुवाधार पावसामुळे शेतकऱ्यांचे सगळे कष्ट एका रात्रीत वाया जातात याचे खूप वाईट वाटते असे म्हणत त्याने सर्वांच्या सुखरुपतेसाठी प्रार्थनाही केली आहे.

त्याने यापूर्वीही शेतकऱ्यांप्रती असलेला त्याचा आदर दाखविणारे ट्विट केले होते. शेतकऱ्यांसाठी असा प्रकारे ट्विट करणारा तू पहिलाच क्रिकेटपटू आहेस असं म्हणत त्याचे अनेकांनी कौतुकही केले आहे. 

18 महिने झाले, प्लिज आता तरी मला वन-डे खेळू द्या ना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajinkya Rahane urgest for the Safety of people and farmers in Maharashtra due to heavy rain