१. आकाश दीपने एकाच षटकात घेतल्या दोन विकेट्स२. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडचा सल्ला आकाशसाठी ठरला फायदेशीर३. आयपीएलमध्ये RCB संघातून एकत्र खेळले होते हेझलवूड आणि आकाश दीप.बर्मिंगहॅम : आयपीएलमुळे भारतीय क्रिकेटचा फायदा होतो की तोटा, यावर सातत्याने चर्चा झडत असतात आणि दोन्ही बाजूंनी अनेक पुरावेही सादर केले जात असतात. आयपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा सहवास लाभल्याने भारतीय खेळाडूंमध्ये किती फरक पडू शकतो, याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे वेगवान गोलंदाज आकाश दीप. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आकाश दीपने डावाच्या तिसऱ्याच षटकात दोन फलंदाज बाद करत यजमान संघाला अडचणीत आणले..भक्कम फलंदाजी केल्यानंतरही गोलंदाज निष्प्रभ ठरल्यामुळे भारताला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर भारतीय संघ व्यवस्थापनावर चौफेर टीका झाली. त्यातच अनुभवी गोलंदाज जसप्रित बुमराह दुसऱ्या कसोटीत खेळणार नसल्याचे जाहीर झाल्यानंतर नवोदित कर्णधार शुभमन गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर विश्लेषकांनी टीकेची झोड उठवली..यामुळे दुसऱ्या कसोटीच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघ दडपणाखाली होता. कर्णधार गिलसह सर्वच फलंदाजांनी उपयुक्त योगदान दिल्यामुळे भारताने पहिल्या डावात ५८७ धावा केल्या. फलंदाजांनी आपली भूमिका पार पाडल्यानंतर लक्ष होते गोलंदाजांच्या कामगिरीकडे.बुमराहच्या जागी संघात स्थान मिळालेल्या आकाश दीपने टाकलेल्या पहिल्याच षटकात ११ धावा चोपल्या गेल्या. यामुळे पुन्हा पहिल्या कसोटीची पुनरावृत्ती होणार, अशी शंका चाहत्यांच्या मनात निर्माण झाली. मात्र तिसऱ्या षटकात आकाशने लागोपाठच्या दोन चेंडूंवर बेन डकेट आणि ऑली पोप यांना बाद केले. यामुळे भारताला वर्चस्व मिळवणे शक्य झाले..आकाशला फायदा झाला हेझलवूडचा२०२२ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या संघात जोश हेझलवूड आणि आकाश दीप यांचा समावेश होता. वरिष्ठ खेळाडू असल्याने हेझलवूड त्याचा अनुभव सांगत असे आणि आकाश दीप त्यातून शिकण्याचा प्रयत्न करत असे.'कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना चेंडूचा टप्पा आणि ऑफ-स्टंपची दिशा हेच सर्वाधिक महत्त्वाचे आहे' असे हेझलवूडने वारंवार सांगितले होते. आकाशने त्या षटकात हाच सल्ला तंतोतंत अंमलात आणला आणि क्षेत्ररक्षकांनीही साथ दिल्याने त्याला दोन विकेट्सही मिळाल्या..१. आकाश दीपने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत काय विशेष कामगिरी केली?आकाश दीपने डावाच्या तिसऱ्या षटकात दोन विकेट्स घेत इंग्लंडला अडचणीत आणले.२. आकाश दीपला काय सल्ला मिळाला होता? जोश हेझलवूडने त्याला कसोटी क्रिकेटमध्ये टप्पा आणि ऑफ-स्टंपवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला होता.३. जसप्रित बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय संघात कुणाला संधी मिळाली?जसप्रित बुमराहच्या जागी आकाश दीपला भारतीय संघात संधी मिळाली.४. IPL चा आकाशच्या खेळावर काय प्रभाव पडला?IPL मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबतचा अनुभव त्याच्या खेळात सुधारणा घेऊन आला.५. जोश हेझलवूड आणि आकाश दीप कधी एकत्र खेळले होते?ते 2022 मध्ये RCB संघात एकत्र खेळले होते.६. आकाश दीपने सलग दोन चेंडूंवर कुणाच्या विकेट्स घेतल्या?आकाश दीपने बेन डकेट आणि ऑली पोप यांना सलग दोन चेंडूंवर बाद केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.