Alcaraz Vs Rublev: विम्बल्डन ग्रँडस्लॅमच्या चौथ्या फेरीत गतविजेता अल्काराझ व अनुभवी जोकोविच यांनी प्रत्येकी चार सेटमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला विभागात अव्वल मानांकित अरीना सबलेंकाने सहज विजय मिळवला.
लंडन : गतविजेता कार्लोस अल्काराझ व सर्बीयाचा दिग्गज खेळाडू नोवाक जोकोविच यांना विम्बल्डन ग्रँडस्लॅम या टेनिस स्पर्धेमध्ये पुरुषांच्या एकेरीतील चौथ्या फेरीमध्ये विजयासाठी कडवी झुंज द्यावी लागली.