Carlos Alcaraz : कार्लोस अल्काराझचा विजयासाठी संघर्ष; विम्बल्डन, फॉगनिनीने झुंजवले

Wimbledon 2025 : गतविजेता कार्लोस अल्काराझने विम्बल्डनच्या पहिल्याच सामन्यात पाच सेट खेळून विजय मिळवला. डॅनिल मेदवेदेवला बिगर मानांकित बेंजामिन बोंझीकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला.
Carlos Alcaraz
Carlos Alcaraz sakal
Updated on

लंडन : गतविजेता कार्लोस अल्काराझ याला विम्बल्डन या प्रतिष्ठेच्या टेनिस ग्रँडस्लॅममध्ये सलामीलाच विजयासाठी संघर्ष करावा लागला. फॅबियो फॉगनिनी याने त्याला कडवी झुंज दिली. स्पेनच्या अल्काराझ याने फॉगनिनीचे आव्हान ७-५, ६-७, ७-५, २-६, ६-१ असे पाच सेटमध्ये परतवून लावले व पुढल्या फेरीत प्रवेश केला. अल्काराझ याला विजयासाठी चार तास व ३५ मिनिटे प्रतीक्षा करावी लागली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com