Italian Open : जर्मनीचा ॲलेक्झँडर झ्वेरेव इटालियन ओपनचा विजेता

ॲलेक्झँडर झ्वेरेव याला दोन वर्षांपूर्वी दुखापतीला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर या पठ्ठ्याला टेनिस कोर्टवर दमदार प्रदर्शनही करता आले नाही.
Italian Open
Italian OpenSakal
Updated on

रोम : जर्मनीच्या ॲलेक्झँडर झ्वेरेव याने इटालियन ओपन स्पर्धेत अजिंक्यपदावर नाव कोरले. त्याने अजिंक्यपदाच्या लढतीत २४ व्या स्थानावर असलेल्या निकोलस जॅरी याच्यावर सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवत झळाळता करंडक पटकावला.

ॲलेक्झँडर झ्वेरेव याला दोन वर्षांपूर्वी दुखापतीला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर या पठ्ठ्याला टेनिस कोर्टवर दमदार प्रदर्शनही करता आले नाही. इटालियन ओपनचे जेतेपद त्याच्यासाठी स्पेशल ठरले आहे. आता आगामी फ्रेंच ओपन या ग्रँडस्लॅमआधी त्याचा आत्मविश्‍वास कमालीचा उंचावला असेल.

फ्रेंच ओपन स्पर्धेसाठीच्या प्रबळ दावेदार टेनिसपटूंच्या यादीत आता त्याचाही समावेश असणार आहे. नोवाक जोकोविच व राफेल नदाल या महान खेळाडूंना सुमार फॉर्ममधून जावे लागत आहे. तसेच यानिक सिन्नर व कार्लोस अल्काराझ या युवा टेनिसपटूंनाही दुखापतींनी घेरले आहे.

त्यामुळे झ्वेरेव याच्याकडे फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये अजिंक्यपद पटकावण्याची सुवर्णसंधी असणार आहे. दरम्यान, याआधी महिला एकेरीची अंतिम लढत पार पडली. यामध्ये इगा स्विअतेक हिने एरीना सबलेंका हिला पराभूत करीत विजेतेपदाचा मान संपादन केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com