भारताचे शेर ढेर होत असताना 20 वर्षाच्या लक्ष्यने दिला सुखद धक्का | Lakshya Sen defeat third seeded Anders Antonsen | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

All England Badminton Open Lakshya Sen defeat third seeded Anders Antonsen

भारताचे शेर ढेर होत असताना 20 वर्षाच्या लक्ष्यने दिला सुखद धक्का

बर्मिंगहॅम: ऑल इंग्लंड बॅडमिंटन (All England Open 2022) स्पर्धेत भारताचे एक एक स्टार बॅडमिंटनपटू (Indian Badminton Players) ढेर होत असताना युवा लक्ष्य सेनने (Lakshya Sen) दमदार कामगिरी करत पुरूष एकेरीची उंपात्यपूर्व फेरी गाठली. लक्ष्य सेनने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या आंद्रेस अँटोनसेनचा (Anders Antonsen) पराभव केला.

लक्ष्य सेनने डॅनिश बॅडमिंटनपटू अँटोनसेनचा 21- 16, 21-18 अशा सरळ गेममध्ये पराभव केला. लक्ष्यने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या खेळाडूचे आव्हान 55 मिनिटात मोडून काढले. कोर्ट 1 वर खेळणाऱ्या 20 वर्षाच्या सेनने पहिल्या ब्रेकमध्येच दोन गुणांची आघाडी घेतली त्यानंतर लक्षने मागे वळून न पाहता पहिला गेम सहज खिशात टाकला.

अव्वल दर्जाच्या अँटोनसेनने दुसऱ्या गेममध्ये जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानावर असलेल्या लक्ष्यला फाईट देण्याचा प्रयत्न केला. त्याने 14-14 अशी बरोबरी देखील साधली. मात्र भारताच्या लक्ष्यने पुन्हा सामन्यावर नियंत्रण मिळवत अँटोनसेनचा कडवा प्रतिकार मोडून काढला आणि सामना जिंकला.

दरम्यान, ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवालने (Saina Nehwal) कोर्ट 4 वर आपले सर्वस्व पणाला लावले होते. मात्र जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या जपानच्या अ‍ॅकने यामागुचीला ती रोखू शकली नाही. यामागुचीने सायनाचा 21-14, 17-21, 21-17 असा पराभव केला. एकीकडे सायनाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर महिला एकेरीमध्ये पीव्ही सिंधूवर सर्वांचे लक्ष होते. मात्र जपानच्या डावखुऱ्या सायाका ताकाहाशीने सिंधूचा 19-21, 21-16, 17-21 अशा तीन गेममध्ये पराभव केला.