
नवी दिल्ली : मनोलो मारकेझ यांनी भारतीय फुटबॉल संघटनेच्या मुख्य प्रशिक्षक पदावरून माघार घेतली. यानंतर आता अखिल भारतीय फुटबॉल संघटनेकडून नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू करण्यात आला आहे. याप्रसंगी इच्छुक असलेल्या व्यक्तींसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ जुलै असणार आहे. तसेच प्रशिक्षकपदासाठी अर्ज करीत असलेल्या व्यक्तीला किमान दहा वर्षांचा अनुभव असावा लागणार आहे.