अंबाती रायडू 'बॅकफूट'वर; निवृत्तीच्या निर्णयावर काय म्हणाला पाहा!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

भारताचा माजी फलंदाज अंबाती रायुडू याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडखी निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर क्रिकेटविश्वात खळबळ माजली होती. मात्र, आता त्याने निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

चेन्नई : भारताचा माजी फलंदाज अंबाती रायुडू याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडखी निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर क्रिकेटविश्वात खळबळ माजली होती. मात्र, आता त्याने निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

''मी भावनेत वाहत गेले आणि निर्णय घेतला,'' असे म्हणत त्याने निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात त्याने आयपीएल खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावरुन तो बॅकफूटला जातोय हे स्पष्ट झाले होते. आता त्याने निवृत्तीचा निर्णय मागे घेत त्याने हैदराबादकडून स्थानक क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

''मला चेन्नई सुपर किंग्ज, व्ही.व्ही.एस लक्ष्मण आणि नोअेल डेव्हिड (हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे सचिव) यांचे आभार मानायचे आहे. माझ्यात आणखी खूप क्रिकेट बाकी आहे याची त्यांनी मला जाणीव करुन दिली आहे. हैदराबादबरोबर या मोसमात चांगला खेळ करण्यासाठी मी उत्सुक आहे. मी 10 सप्टेंबरपासून संघासाठी उपलब्ध राहिल,'' अशा शब्दांत त्याने आपला निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय अप्रत्यक्षपणे जाहीर केला.   

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambati Rayudu To Come Out Of Retirement For Playing For Hyderabad