FIFA World Cup 2022 Qatar Fan Protest VIDEO
FIFA World Cup 2022 Qatar Fan Protest VIDEOesakal

VIDEO : पोर्तुगाल - उरूग्वे सामन्यात मारियोने कतारच्या क्रूर नियमांच्या उडवल्या चिंधड्या

FIFA World Cup 2022 Qatar Fan Protest : कतारमध्ये होत असलेला फिफा वर्ल्डकप 2022 हा जसा तेथील नयनरम्य आणि अत्याधुनिक स्टेडियमसाठी ओळखला जात आहे. तसाच तो जाचक नियम आणि दडपशाहीसाठी देखील ओळखला जात आहे. मात्र कतार प्रशासनाच्या या जाचक अटी अन् नियामांना झुंगारून देत काही फुटबॉल चाहत्यांनी दडपशाहीविरूद्ध उठाव केल्याचेही आतापर्यंतच्या वर्ल्डकप सामन्यात दिसून आले आहे. काल झालेल्या पोर्तुगाल आणि उरूग्वे सामन्यात देखील मारियो फेरी या चाहत्याने कतारचे सगळे कडक नियम, आणि धमक्यांना धाब्यावर बसवत LGBTQ+ समुदाय, युक्रेन, इराणच्या महिलांचे स्वतंत्र्य यांना जाहीर समर्थन दिले.

FIFA World Cup 2022 Qatar Fan Protest VIDEO
सानिया शोएबच्या लव्हस्टोरीत मिठाचा खडा टाकणाऱ्या आयेशाने दिलं स्पष्टीकरण

पोर्तुगाल आणि उरूग्वे यांच्यातील हाय व्होल्टेज सामना सुरू असतानाच फुटबॉल चाहता मैदानात LGBTQ+ समुदायाचे प्रतिक असलेला झेंडा घाऊन मैदानात धावू लागला. लुसैस स्टेडियमवरील सुरक्षा रक्षक त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावू लागले. मात्र या शर्यतीत कतारचा सुरक्षा रक्षक खूप मागे पडला. विशेष म्हणजे या फुटबॉल चाहत्याने आपल्या टीशर्टवर पुढे सेव्ह युक्रेन आणि पाठीमागे इराणी महिला स्वातंत्र्याला पाठिंबा देणारा मजकूर लिहिला होता. यामुळे या चाहत्याने एकाचवेळी तीन विषयांना हात घालत आपले अनोखे आंदोलन केले. कतारमध्ये समलैंगिकता हा एक मानसिक आजार असून त्याला मान्यता नाहीये.

FIFA World Cup 2022 Qatar Fan Protest VIDEO
Sania Mirza: हो...सानिया मिर्झा- शोएबचा घटस्फोट झालाय; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

दरम्यान, इराणची महिला पत्रकार मसिह अलीनेजाद यांनी या आंदोलक फुटबॉल चाहत्याचे नाव उघड केले. मसिह यांनी ट्विट केले की, 'मारियो फेरी सारखे शूर व्हा. कतारने LGBTQ झेंडा आणि महिलांच्या स्वातंत्र्याबाबतच्या घोषणाबाजीवर प्रतिबंध घातला आहे. या शूर व्यक्तीने भर मैदानात LGBTQ, इराणी महिला आणि युक्रेनचे समर्थन करून आपण इतिहासाच्या योग्य गटात असल्याचे दाखवून दिले. कतारच्या सरकार सारखं होऊ नका. मारिया फेरी सारखं व्हा.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com