सचिन तेंडुलकरबद्दल चुकीची माहिती; अमिताभ बच्चन यांचा माफीनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh Bachchan And   Sachin Tendulkar

सचिन तेंडुलकरबद्दल चुकीची माहिती; अमिताभ बच्चन यांचा माफीनामा

आगामी 20 जानेवारीपासून मस्कट येथे 'लीजेंड्स लीग क्रिकेट' स्पर्धा पार पडणार आहे. या लीगमध्ये एकूण तीन संघ सहभागी असणार आहेत. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी एका जाहिरातीच्या माध्यमातून या लीगमध्ये क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खेळणार असल्याचे दाखवण्यात आले होते. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) स्पर्धेत सहभागी होणार असल्याच्या जाहिरातीमध्ये बॉलिवूडचे शहंशहा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) झळकले होते. (Amitabh Bacchan apology sharing wrong adevertisement involving Sachin Tendulkar)

सचिनशी संबंधित व्यवस्थापकीय कंपनी 100MB ने एका ट्विटरच्या माध्यमातून सचिन तेंडुलकर लीगचा हिस्सा नसल्याचे स्पष्ट केले आहे. एवढेच नाही तर 100MB कंपनी अमिताभ यांची जाहिरात ज्या चॅनेलनं दाखवली त्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. या कंपनीने ट्विटरवर शेअर केलेल्या माहितीनुसार, 'सचिन 'लीजेंड्स लीग क्रिकेट'मध्ये भाग घेणार असल्याचे वृत्त चुकीचे आहे. आयोजक आणि अमिताभ बच्चन यांनी क्रिकेट चाहत्यांपर्यंत चुकीची माहिती पोहचणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे.

आगामी स्पर्धेत देशातील अनेक माजी क्रिकेटर सहभागी होणार आहे. या स्पर्धेत जे तीन संघ सहभागी होणार आहेत त्यात भारत, आशिया आणि रेस्ट ऑफ द वर्ल्ड अशी वर्गवारी करण्यात आली आहे. मास्टर ब्लास्टर या स्पर्धेत खेळणार असल्याची जाहिरात पाहिल्यानंतर सचिनच्या चाहत्यांना खूपच आनंद झाला होता. त्याची फटकेबाजी पुन्हा एकदा पाहायला मिळणार असे चित्र निर्माण झाले. पण आता अनेक चाहत्यांच्या पदरी निराशाही आली आहे.

अमिताभ बच्चन यांनी ट्विटच्या माध्यमातून चुक कबूल केली आहे. त्यांनी या लीगसंदर्भातील फायनल व्हिडिओ शेअर करत आधीच्या व्हिडिओसंदर्भात माफीही मागितली आहे. अमिताभ यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत अनेक दिग्गजांची नावे दाखवण्यात आली आहेत. यात पाकिस्तानच्या वासीम आक्रम यांच्यापासून सेहवागपर्यंत अनेक दिग्गजांचा समावेश आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top