INDvsWI : बिग बी म्हणतात, ''कितनी बार बोला, विराट को मत छेड!''

वृत्तसंस्था
शनिवार, 7 डिसेंबर 2019

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या ट्वेंटी20 सामन्यानंतर सर्वांत जास्त चर्चा झाली ती विराटने केसरिक व्हिल्यम्सला उद्देशून केलेल्या त्या ऍक्शनची. त्याच्या या आक्रमकवृत्तीने फलंदाजी करण्यामुळे भारताला विंडीजवर सहा गडी राखून विजय मिळवता आला. त्याच्या या आक्रमक ऍक्शनचे महानायक अमिताभ बच्चन यांनीसुद्धा कौतुक केले आहे. 

''T 3570 - यार कितनी बार बोला मई तेरे को, की Virat को मत छेड़, मत छेड़, मत छेड़ पन सुनताइच किधर है तुम.. अभी पर्ची लिख के दे दिया ना हाथ में !!!! देख देख. WI का चेहरा देख; कितना मारा उसको, कितना मारा!!'' असे भन्नाट ट्विट केले आहे. 

त्याचे झाले असे की 2017मध्ये झालेल्या एका ट्वेंटी20 सामन्यात व्हिल्यम्सने कोहलीला बाद केल्यावर त्याची वहीत नोंद करुन घेतल्याची ऍक्शन केली होती. कोहलीने तीच ऍक्शन लक्षात ठेवली होती.  त्याने कालच्या सामन्यात व्हिल्यम्सला षटकार मारल्यावर त्याच्याट स्टाईलमध्ये त्याला ती ऍक्शन करुन दाखवत प्रत्युत्तर दिले. 

सामन्यानंतर त्या ऍक्शनविषयी बोलताना तो म्हणाला, ''त्याने कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये नाही तर माझी विकेट घेतल्यावर असं सेलिब्रेशन केलं होतं. म्हणून मीसुद्धा माझ्या वहीत नोंद करुन घ्यावी म्हटलं. आमच्या थोडं बोलणं झालं पण नंतर आम्ही हसायला लागलो. स्पर्धात्मक क्रिकेट पाहण्यातच तर मजा असते, खुन्नस देऊन खेळा पण प्रतिस्पर्ध्यांचा आदर करा, हेच तर क्रिकेट आपल्याला शिकवते.''

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amitabh Bachchan posted a hilarious tweet for Virat Kohlis notebook action