
शांघाय : झुंझार खेळ करत पिछाडीवरून बाजी मारणाऱ्या अमरावतीच्या मधुरा धामणगावकर हिने आपले पहिलेवहिले सुवर्णपदक मिळवले. त्यामुळे येथे सुरू असलेल्या विश्वकरंडक तिरंदाजी कंपाउंड (स्टेज-२) स्पर्धेत भारताने एकूण दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन ब्राँझपदकांची कमाई केली.