
Anand Mahindra : केनच्या हुकलेल्या पेनाल्टीवर आनंद महिंद्रांचा प्रश्न, वेळेत उत्तर द्या अन् जिंका गाडी
Anand Mahindra Tweet Harry Kane : संपूर्ण जगभर सध्या कतारमधील फिफा वर्ल्डकपचा फिव्हर सुरू आहे. क्रिकेटला धर्म मानणाऱ्या भारतात देखील सध्या या वर्ल्डकपची चांगली क्रेझ दिसून येत आहे. दरम्यान, भारताचे प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन याच्याबद्दल ट्विटरवर एक प्रश्न विचारला सध्या हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.
फिफा वर्ल्डकप 2022 च्या क्वार्टर फायनल फेरीत इंग्लंड आणि गतविजेत्या फ्रान्स यांच्या सामना रंगला. हा सामना फ्रान्सने 2 - 1 असा जिंकला. या सामन्यात इंग्लंडला सामना बरोबरीत आणण्याची नामी संधी होती. मात्र हॅरी केनला सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये पेनाल्टी किक मिळून देखील त्याचा फायदा उचलता आला नाही. याबाबतच आनंद महिंद्रांनी ट्विट करून एक प्रश्न विचारला.
हेही वाचा: Lionel Messi : कूल मेस्सी जेव्हा भडकतो... सामन्यात 16 पिवळे कार्ड दाखवणाऱ्या पंचाला FIFA ने पाठवले घरी
आनंद महिंद्रा आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, 'हॅरी केनची पेनाल्टी किक हुकली. जर तुम्ही त्याचे कोच असता तर त्या क्षणाला तुम्ही त्याला काय म्हणाला असता? उत्तर 1 ते 2 वाक्यात उपेक्षित. माझ्या मते जो बेस्ट कोच असेल त्याला महिंद्रा गाडीची छोटी प्रतिकृती देण्यात येईल. तुम्ही तुमचे उत्तर 14 डिसेंबर सकाळी 9 वाजेपर्यंत देऊ शकता.'
हेही वाचा: FIFA WC22: मेस्सी आता फक्त दोन पावले दूर!
दरम्यान, केनने सामन्याच्या 54 व्या मिनिटाला पेनाल्टीवर गोल करत फ्रान्सशी 1 - 1 अशी बरोबरी साधली होती. मात्र ऑलिव्हर गिरॉडने 78 व्या मिनिटाला फ्रान्सकडून दुसरा गोल करून 2 - 1 अशी आघाडी घेतली. ही आघाडी बरोबरीत रूपांतरित करण्याची नामी संधी केनला पेनाल्टी किकद्वारे मिळाली होती. मात्र 82 व्या मिनिटाला केनने मारलेली पेनाल्टी हुकली अन् इंग्लंडच्या हातून सामना बरोबरीत आणण्याची संधी देखील गेली.
हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....