
Andrew Symonds : क्रिकेट जगताला हादरवून सोडणारा 'मंकी गेट' कांड
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू आणि दोन वेळा विश्वचषक विजेता अँड्र्यू सायमंड्स यांचे वयाच्या अवघ्या 46 व्या वर्षी एका कार अपघातात निधन झाले. मधल्या फळीतील फलंदाजांच्या दुःखद निधनाने क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या निधनाच्या बातमी नंतर जगभरातून आणि क्रिकेटविश्वातून त्याला श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
यामध्ये भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने सायमंड्सच्या कुटुंबाबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय ऑफ स्पिनर हरभजन सिंग आणि ऑस्ट्रेलियन सायमंड्समध्ये भांडण झाले होते. ज्याने क्रिकेटच्या जगात वर्णद्वेषी भेदभाव आणल्याबद्दल भज्जी आणि सायमंड्समध्ये मतभेद झाले होते. 'मंकी गेट' या नावाने प्रसिद्ध असलेली घटना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट संबंधांमधील एक वाईट टप्पा होता.(Harbhajan Singh mourns the demise of Australia all-rounder Andrew Symonds)
हेही वाचा: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू Andrew Symondsचा कार अपघातात मृत्यू
क्रिकेटविश्वात 6 जानेवारी 2008 रोजी अशी एक घटना घडली ज्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता आणि दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान सिडनीमध्ये हरभजन सिंग आणि अँड्र्यू सायमंड्स मध्ये असा प्रकार घडला की त्यानंतर मालिका रद्द करण्यापर्यंतची परिस्थिती आली होती. अखेर क्रिकेट जगताला हादरवून सोडणारा काय होता आणि त्या दिवशी काय घडले ते जाणून घेऊया.
2007-08 मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळल्या जाणार होती. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि मालिकेतील दुसरी कसोटी सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवली जाणार होती. दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने शानदार सुरुवात करत ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांना २४ धावांच्या आत पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मात्र तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रिकी पाँटिंगने चौथ्या क्रमांकाचा फलंदाज माईक हसीच्या साथीने ऑस्ट्रेलियन संघाला संकटातून बाहेर काढले आणि संघाची धावसंख्या 100 च्या पुढे नेली. त्यानंतर अँड्र्यू सायमंड्सने खालच्या फळीतील फलंदाजांसह डाव सांभाळला आणि शतक केलं. दुसरीकडे सायमंड्सचे शतक आणि खालच्या फळीतील उपयुक्त खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 463 धावा केल्या.
हेही वाचा: 20 व्या वर्षी 20 षटकार; मात्र व्यसनामुळे मातीमोल झाली क्रिकेट कारकिर्द
प्रत्युत्तर देत मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला चोख उत्तर दिले. भारताच्या डावात सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी शतके झळकावली, तर द्रविड, गांगुली आणि हरभजन यांनी अर्धशतके झळकावली. पण सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मैदानावर जे काही घडले त्याचा परिणाम संपूर्ण मालिकेवर झाला.
सचिनसोबत हरभजन सिंग क्रिजवर फलंदाजी करत होता. हरभजनने सचिनला सांगितले की सायमंड्स मला भडकवत आहे. मात्र यानंतर हरभजन काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत मैत्रीपूर्ण वागणूक देत होता. हरभजनने शॉट खेळला आणि धाव घेत असताना त्याने ब्रेट लीच्या पाठीवर थोपटले. त्यानंतर सायमंड्स भडकला. विरोधी संघातील खेळाडू ब्रेट लीशी मैत्रीपूर्ण वृत्ती अंगीकारतात हे सायमंड्सला सहन झाले नाही.
सायमंड्सने हरभजनविरुद्ध असभ्यता व्यक्त केली. त्यानंतर सायमंड्स आणि हरभजनमध्ये वाद इतका वाढला की, मॅचमध्ये अंपायरिंग करणाऱ्या मार्क बेन्सनने हरभजनशी बोलले. पंच हरभजनशी बोलत असताना संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाने त्याला घेरले आणि हरभजनला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा धमक्या देण्यास सुरुवात केली. मात्र हरभजन ऑस्ट्रेलियाच्या चक्रव्यूहात अडकला आणि तो 63 धावा करून बाद झाला.
क्रिकेटचा सर्वात मोठा वाद आधीच सुरू झाला होता आणि ऑस्ट्रेलियाने आरोप केला की हरभजन सायमंड्सला माकड म्हणाला होता. सायमंडने हरभजनवर वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा आरोप केला होता. मात्र हरभजन सिंगसह संपूर्ण टीमने हा आरोप साफ फेटाळून लावला होता. मात्र असे असतानाही आयसीसीने हरभजनवर तीन सामन्यांची बंदी घातली.
Web Title: Andrew Symonds Death Monkeygate When Harbhajan Singh And Andrew Symonds Were Involved
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..