Anil Kumble R. Ashwin : अश्विनने घेतल्या डझनभर विकेट्स तरी कुंबळे म्हणतो 'या' फिरकीपटूला मिळावी संधी

Anil Kumble R. Ashwin
Anil Kumble R. Ashwinesakal

Anil Kumble R. Ashwin : भारताने पहिल्या कसोटीत वेस्ट इंडीजचा तीन दिवसातच धुव्वा उडवला. भारताने पहिली कसोटी एक डाव आणि तब्बल 141 धावांनी जिंकली. भारताने 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली.

भारताकडून गोलंदाजी रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) भीमकाय पराक्रमक केला. त्याने पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 7 विकेट्स घेतल्या. (India Vs West Indies 2nd Test)

सामन्यात डझनभर विकेट घेणाऱ्या अश्विनने WTC Final मध्ये त्याला प्लेईंग 11 मधून वगळणे ही मोठी चूक होती हे दाखवून दिले. विंडीजविरूद्धच्या सामन्यात रविंद्र जडेजाने देखील दोन डावात मिळून 5 विकेट्स घेतल्या.

मात्र तरी देखील भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळेच्या (Anil Kumble) मते भारतीय संघव्यवस्थापनाने चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) संधी द्यायला हवी.

Anil Kumble R. Ashwin
Duleep Trophy 2023 Final : पुजारासाठी परतीचे दोर कापले, सूर्याही 'कसोटी'त नापास; विहारीचं नाणं मात्र खणखणीत!

अनिल कुंबळे हा सध्या जिओ सिनेमावर समालोचकाची भुमिका बजावत आहे. तो जिओ सिनेमावरील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला की, 'कसोटीसाठी कुलदीप यादव हा एक चांगला फिरकीपटू आहे. त्याला ज्या ज्यावेळी संधी मिळाली आहे त्या त्यावेळी त्याने चांगली कामगिरी केली आहे. वनडे, टी 20 क्रिकेटमध्ये अनेक रिस्ट स्पिनर आहे. आपल्याकडे कसोटी क्रिकेटमध्ये तितके रिस्ट स्पिनर नाहीत.'

अनिल कुंबळेने अश्विन आणि जडेजा (Ravindra Jadeja) या फिरकी जोडीचे कौतुक केले. याचबरोबर अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलचा देखील विशेष उल्लेख केला.

Anil Kumble R. Ashwin
Jasprit Bumrah Team India : खुशखबर! बुमराह भारतीय संघात परतणार; श्रेयस अय्यरने वाढवली निवडसमितीची डोकेदुखी

कुंबळे म्हणाला की, 'अश्विन आणि जडेजा हे संघासाठी सध्या खूप चांगली कामगिरी करत आहेत. दोघेही उच्च श्रेणीचे गोलंदाज आहेत. तिसरा फरकीपटू अक्षर पटेलने देखील संधी मिळाल्यावर चांगली कामगिरी केली आहे. मला म्हणायचं आहे की कुलदीप यादवला देखील त्याच्यासोबत ठेवा आणि संधी मिळताच त्यालाही खेळवा.'

कुलदीप यादवला वेस्ट इंडीज विरूद्धच्या कसोटी संघात स्थान देण्यात आलेला नाही. त्याने 2022 मध्ये बांगलादेशविरूद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. मात्र त्याची वेस्ट इंडीज विरूद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com