
अनुष्कानं शेअर केला ग्रीन बिकिनीतला फोटो, विराट झाला रोमँटिक
भारतीय कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विश्रांती घेण्याला पसंती दिलीये. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसह कसोटी सामन्यालाही तो भारतीय संघाचा भाग नसेल. इंग्लंड दौरा त्यानंतर आयपीएलची स्पर्धा आणि टी-20 वर्ल्ड कप हा सातत्यपूर्ण क्रिकेटचा मोठ्या पल्ल्याचा प्रवास केल्यानंतर सध्या तो कुटुंबियांसह क्वॉलिटी टाइम घालवत आहे.
कोहली मैदानात असला किंवा मैदानाबाहेर असला तरी तो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. न्यूझीलंड दौऱ्यातून ब्रेकवर असलेल्या कोहली अनुष्काच्या एका फोटोमुळे चर्चेत आलाय. त्याच झालं असं की, त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानं ग्रीन बिकीनीत एक फोटो शेअर केलाय. स्विमिंग पूलमधील या फोटोवर विराट कोहलीने रोमँटिक कमेंट दिलीये. त्याची सोशळ मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीये. अनेक जण विराटच्या या अंदाजाला पसंती देताना दिसते आहे.

अनुष्का शर्माने अधिकृत इन्स्टाग्रामवरुन ग्रीन कलरच्या बिकिनेतील दोन फोटो शेअर केले आहेत. या दोन्ही फोटोमध्ये अनुष्का शर्मा स्विमिंग पूलमध्ये असल्याचे दिसते. विराट कोहलीने लव्ह इमोजीसह अनुष्काच्या फोटोवर रोमँटिक कमेंट दिलीये.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले. ही स्पर्धा कोहलीसाठी खास होती. या स्पर्धेनंतर टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा त्याने आधीच केली होती. आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला आयसीसीची ट्रॉफी जिंकून देण्याची त्याला चौथ्यांदा संधी मिळाली होती. पण त्यात तो अपयशी ठरला. वर्कलोडमुळे टी-20 मधील कर्णधारपद सोडून बॅटिंगवर फोकस करण्याचा त्याचा प्रयत्न राहणार आहे. पुन्हा क्रिकेटला सुरुवात करण्यापूर्वी तो कुटुंबियासोबत वेळ घालवत आहे.