Anushkma Sharma Virat Kohli Daughter : कितीही लपवलं तरी दिसलीच; विरुष्काची लेक पुन्हा कॅमेऱ्यासमोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli Anushka Sharma
Anushkma Sharma Virat Kohli Daughter : कितीही लपवलं तरी दिसलीच; विरुष्काची लेक पुन्हा कॅमेऱ्यासमोर

Anushkma Sharma Virat Kohli Daughter : कितीही लपवलं तरी दिसलीच; विरुष्काची लेक पुन्हा कॅमेऱ्यासमोर

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांची मुलगी सध्या चर्चेत आली आहे. अनुष्का आणि विराटने तिला कॅमेऱ्यापासून दूर ठेवलं असलं तरी पुन्हा एकदा तिची छबी कॅमेऱ्याने टिपली आहे.

विराट आणि अनुष्का यांची मुलगी वामिका हिचे फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल होत होते. मात्र या दोघांनीही फोटो हटवण्याची विनंती केल्यानंतर सोशलमीडियासह माध्यमांमधून हे फोटो ड़िलीट करण्यात आले. पहिल्यापासून या दोघांनी लेक वामिकाचा चेहरा दाखवला नव्हता.

हेही वाचा: Virat Kohli : विराट कोहली अनुष्कासोबत व्हेकेशनवर, संघाची घोषणा होताच गाठले मुंबई विमानतळ

मात्र आता पुन्हा एकदा वामिकावर कॅमेऱ्याची नजर पडली आहे. विराट आणि अनुष्का वामिकासह वृंदावन इथं गेले होते. तेव्हा वामिका अनुष्काच्या मांडीवर खेळताना दिसत आहे.

अनुष्का, विराट आणि वामिकाचा हा व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांनी शेअर केला आहे. हे तिघेही वृंदावन इथं दर्शन घेण्यासाठी गेले होते. तिथे अनुष्का आणि विराट प्रार्थना करत होते, तर वामिका अनुष्काच्या मांडीवर बसली होती आणि इकडे तिकडे कुतुहलाने पाहत होती.

विराट आणि अनुष्काने वृंदावन इथं ब्लँकेटचं वाटप केलं. त्यानंतर त्यांनी नीम करोली बाबा यांच्या आश्रमाला भेट दिली.

टॅग्स :Virat kohlianushka sharma