
सुपरस्टार लिओनेल मेस्सी आणि लौतारो मार्टिनेझ यांच्या अनुपस्थितीतही विश्वविजेत्या अर्जेंटिनाने दक्षिण अमेरिका विश्वकरंडक फुटबॉल पात्रता गटात उरुग्वेचा १-० असा पराभव केला.
अर्जेंटिनाच्या थियागो अल्माडा याने गोलपोस्टच्या कोपऱ्यावरून गोलाकार आणि ताकदवर कीक मारून केलेला गोल सामन्यातील निर्णायक ठरला. येत्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरण्याकरिता अर्जेंटिना आता केवळ एक गुण दूर आहे.