
Argentina Defeated Brazil :विश्वविजेत्या अर्जेंटिनाने पुढील वर्षी होणाऱ्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील निश्चित झालेल्या आपल्या प्रवेशाचा आनंद पारंपरिक प्रतिस्पर्धी ब्राझीलचा ४-१ असा धुव्वा उडवून साजरा केला. मेस्सी या सामन्यातही न खेळताना अर्जेंटिनाने आपले वर्चस्व सिद्ध केले.
ज्युलियन अल्वारेझ, एन्झो फर्नांडेझ, अलेक्सिस मॅक अलिस्टर आणि जिउलियानो सिमोने यांनी अर्जेंटिनाकडून गोल केले. अर्जेंटिना आणि ब्राझील यांच्यातील सामना सुरू होण्याअगोदर बोलिविया आणि उरुग्वे यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत सुटली, तेथेच अर्जेंटिनाचा विश्वकरंडक स्पर्धेतील प्रवेश निश्चित झाला होता.