
नवी दिल्ली : भारताचा नऊवर्षीय खेळाडू आरित कपिल याने बुद्धिबळाच्या पटावर एकापेक्षा एक अशा भेदक चाली रचत माजी विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनची भंबेरी उडवली. या लढतीत आरितकडे विजयाची संधी होती, पण वेळेच्या अभावी ही लढत ड्रॉ राहिली. ‘अर्ली टायटल्ड ट्युसडे’ या स्पर्धेअंतर्गत दोघेही एकमेकांसमोर आले होते. ही स्पर्धा ऑनलाइन खेळवली गेली.