esakal | ...म्हणून अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या वरिष्ठ संघात मिळाले स्थान
sakal

बोलून बातमी शोधा

 arjun tendulkar,  mumbai team, syed mushtaq ali trophy

अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धेत खेळला आहे. तो भारतीय संघाला नेटमध्ये गोलंदाजी करतानाही दिसला आहे. एवढेच नाही तर आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून नेट बॉलर म्हणून दुबईलाही गेला होता. श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या 19 वर्षीय भारतीय संघातही त्याला स्थान मिळाले होते.  

...म्हणून अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या वरिष्ठ संघात मिळाले स्थान

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला पहिल्यांदाच मुंबईच्या सीनिअर संघात स्थान मिळाले आहे. डावखुरा जलदगती गोलंदाज अर्जुन तेंडुलकरची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी मुंबईच्या 22 सदस्यांच्या संघात समावेश करण्यात आलाय. यापूर्वी अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या ज्यूनिअर संघातून खेळला आहे. मुंबई संघाचे निवड समितीचे प्रमुख सलील अंकोला यांनी या वृत्ताची पुष्टी केली आहे. 

अर्जुनशिवाय जलदगती गोलंदाज कृतिक एच यालाही मुंबईच्या संघात स्थान देण्यात आले आहे. एमसीएच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी बीसीसीआयने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी 20 सदस्यीय संघ निवडण्यास सांगितले होते. त्यानंतर आणखी दोन खेळाडूंची निवड करण्यास परवानगी दिली. संघात वर्णी लागल्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

पोंगल कसोटी हे स्वप्नच! कसोटीची परंपरा आणि वादंगाचे रंग

अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धेत खेळला आहे. तो भारतीय संघाला नेटमध्ये गोलंदाजी करतानाही दिसला आहे. एवढेच नाही तर आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून नेट बॉलर म्हणून दुबईलाही गेला होता. श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या 19 वर्षीय भारतीय संघातही त्याला स्थान मिळाले होते.  

क्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्यांसाठी सकाळच्या स्पोर्ट्स साईटला भेट द्या  

आयपीएलपूर्वीची महत्त्वपूर्ण स्पर्धा 

मुंबई संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आहे. 10 जानेवारीपासून होणाऱ्या या स्पर्धेत मुंबईला सर्व सामने हे घरच्या मैदानावरच खेळायचे आहेत. सूर्यकुमार यादव सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठीच्या सामन्यात दमदार कामगिरी करुन इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या ब्लू जर्सीत संधी मिळवण्यासाठी उत्सुक असेल.  

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील स्पर्धा एप्रिल-मेच्या दरम्यान होणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर भारतात पहिल्यादा आयपीएल रंगल्याचे पाहायला मिळेल. या स्पर्धेचा फॉर्मेट अगदी सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीप्रमाणेच आहे. त्यामुळे ही स्पर्धा आयपीएलच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 

loading image