Video : भारताच्या पराभवानंतर अर्शदीपला चाहत्याने म्हटले 'देशद्रोही', त्यानंतर झाले ते... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

arshdeep singh fan called traitor video

Video : भारताच्या पराभवानंतर अर्शदीपला चाहत्याने म्हटले 'देशद्रोही', त्यानंतर झाले ते...

आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाच्या कामगिरीने चाहते खूपच निराश झाले आहेत. टीम इंडियाचा आशिया कप-2022 चा प्रवास जवळपास संपला आहे. सुपर-4 टप्प्यात पाकिस्तान आणि त्यानंतर श्रीलंकेकडून झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे बहुतांश मार्ग बंद झाले आहेत. पण पाकिस्तानविरुद्ध झेल सोडल्यामुळे अर्शदीप सिंग निशाण्यावर आला. सुपर 4 च्या दोन्ही लढतींनंतर चाहत्यांनी अर्शदीपला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले. मात्र मैदानाबाहेर पडलेल्या अर्शदीपला चाहत्याने देशद्रोही म्हटल्याने हद्द झाली.

हेही वाचा: Asia Cup : ऋषभ तू धोनीसारखा चलाख कधी होणार? नेटकऱ्यांनी झापलं

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अर्शदीप सिंग हॉटेलमधून टीम बसमध्ये जात आहे. त्याचवेळी एक व्यक्ती त्याला 'देशद्रोही' म्हणत आहे. झेल सोडल्याबद्दल त्याला शिव्या देत असतो. यादरम्यान अर्शदीप सिंह बसमध्ये उभा राहतो आणि थोडा वेळ त्यांच्याकडे पाहतो आणि मग पुढे जातो. टीम बसजवळ उपस्थित असलेले क्रीडा पत्रकार विमल कुमार यांनीही त्याला 'देशद्रोही' म्हणणाऱ्या व्यक्तीला फटकारले. विमल कुमार म्हणाले की, तो भारतीय खेळाडू आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी असे शब्द वापरत आहात.

हेही वाचा: Bhuvaneshwar Kumar: आधी पाक अन् आता लंका; 'त्या' 2 ओव्हरने टीम इंडियाला बाहेर!

सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला पकडले आणि टीम बसमधून दूर नेले. पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 सामन्यात अर्शदीप सिंगचा एक झेल सुटला होता. त्यामुळे टीम इंडियाला हा सामना गमवावा लागला असे मानले जात आहे. या सामन्यानंतर सोशल मीडियावर अर्शदीपवर निशाणा साधण्यात आला होता, तरीही टीम इंडियाने अर्शदीप सिंगला पूर्ण पाठिंबा दिला होता. आधी विराट कोहली, नंतर रोहित शर्माने उघडपणे सांगितले की, कॅच ड्रॉप होणे हा खेळाचा एक भाग आहे, अशा परिस्थितीत तुम्ही कोणालाही टार्गेट करू शकत नाही.

Web Title: Arshdeep Singh Fan Called Traitor Video In Dubai India Vs Pakistan Drop Catch Asia Cup 2022 Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..