मायदेशात फिरकी प्रथमच बेहाल; 33 षटकांत एकही विकेट न घेण्याचा विक्रम

Article on performance of Indian spinners by Shailesh Nagwekar
Article on performance of Indian spinners by Shailesh Nagwekar

चेन्नई : भारतीय खेळपट्या आणि त्याही दक्षिण भारतातील असल्या तर त्या हमखास फिरकीस साथ देणाऱ्या असतात हा समज केवळ भारतातच नव्हे तर क्रिकेट विश्वात प्रसिद्ध आहे. चेन्नईतील चिपॉकची खेळपट्टी तर फिरकीचे माहेर घर म्हणायला हरकत नाही. अनेक दिग्गजांनी येथील फिरकीस साथ देणाऱ्या खेळपट्टीवर हुकूमत गाजवलेली आहे. पण रविवारी मात्र फिरकी खेळपट्टी आणि फिरकी गोलंदाजांचे यश हा इतिहास केवळ चिपॉकपर्यंत नव्हे तर भारतातील एकदिवसीय सामन्यांमध्ये बदलला. वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील एकदिवसीय सामन्यात 97.5 षटकांचा खेळ झाला त्यात फिरकी गोलंदाजांनी 33 षटके गोलंदाजी केली, पण एकही विकेट मिळवता आली नाही. इतकी षटके फिरकी गोलंदाजांना यश न मिळणे हे भारतात प्रथमच घडले.

या आकेडवारीतून दोन गोष्ट पुढे येतात  
1) खेळपट्टी फिरकीस अनुकुल नव्हती ?
 2) फिरकी गोलंदाज निष्प्रभ ठरले ?  
यातील पहिल्या प्रश्नाचा विचार केला तर चिपॉकची खेळपट्टी पाटा नव्हती चेंडू अधून मधून वळत होते त्यामुळे खेळपट्टीचा दोष नाही.

2) दुसरा प्रश्न फिरकी गोलंदाज निष्प्रभ ठरण्याचा तर त्याचे उत्तर होय असेच आहे. शेन वॉर्न किंवा मुथय्या मुरलीधरन हे तर काचेवरही चेंडू वळवतील असे म्हटले जायचे. थोडक्यात काय तर कोणत्याही खेळपट्टीवर चेंडू वळवण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. त्यात काल भारतीय संघात मनगटाने चेंडू वळवणारा कुलदीप यादव होता. त्याचे काही चेंडू वळले परंतु त्यावर फलंदाज बाद झाले नाहीत. रवींद्र जडेजा खरोखरीच चेंडू वळवतो का आता हे तपासावे लागेल. यात महत्वाचे म्हणजे जडेजा सध्या ताशी 90 कि.मी.पेक्षा अधिक गतीने चेंडू टाकतोय. असे वेगातले चेंडू वळणार नाहीच.

प्रामुख्याने भारकीय फिरकी गोलंदाजांना यश मिळाले नाही त्यामुळे हेटमायर किंवा शेय होप यांच्या खेळाचे महत्व कमी होत नाही. या दोघांनी दडेजा किंवा कुलदीप यांना टप्पाच सापडू दिला नाही. हे ही तेवढेच सत्य आहे.

पहिल्या सामन्यात फिरकी गोलंदाजांची टाकलेली षटके

वेस्ट इंडीज : हेडन वॉल्श 5-0-31-0. रॉस्टन चेस 7-0-42-0

भारत : कुलदीप यादव 10-0-45-0, रवींद्र जडेजा 10-0-58-0, केदार जाधव 1-0-11-0

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com