विराटने रचला इतिहास, 'दुहेरी शतक' झळकावल्यानंतर शेअर केला खास व्हिडिओ

टीम इंडियाचा रन मशीन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहलीने मैदानाबाहेर दुहेरी शतक ठोकले आहे.
विराटने रचला इतिहास, 'दुहेरी शतक' झळकावल्यानंतर शेअर केला खास व्हिडिओ
esakal

टीम इंडियाचा रन मशीन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहलीने मैदानाबाहेर दुहेरी शतक ठोकले आहे. त्याने या द्विशतकाचा व्हिडीओ शेअर करत आनंद साजरा केला आहे.

विराटने रचला इतिहास, 'दुहेरी शतक' झळकावल्यानंतर शेअर केला खास व्हिडिओ
पांड्या टीम इंडियाच्या लिडरशिप ग्रुपमध्ये; द्रविडने काय दिले उत्तर?

गेल्या काही दिवसांपासून विराट खराब फॉर्मशी झगडत असला तरी त्याच्या फॉलोअर्सची संख्येत वाढ होत राहिली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट तीन वेळा डक आऊट झाला त्याचा १५ व्या सीझनमधील फॉर्म हा खराब राहिला. त्यामुळे त्याच्यावर क्रिकेट जगतातून टीकेची झोड उठली तर काही दिग्गजांनी त्याला ब्रेक घेण्याचा सल्ला दिला. दरम्यान, विराटने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत इंस्टाग्रामवर दुहेरी शतक ठोकल्याचे सेलिब्रेशन केलं आहे.

विराट कोहलीने इतिहास रचला आहे. विराट हा भारतातील सर्वाधिक इंस्टाग्राम फॉलोअर्स असलेला व्यक्ती आहे आणि आता त्याने या बाबतीत 'दुहेरी शतक' झळकावले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 200 मिलियन फॅन्स असलेला विराट जगातील पहिला क्रिकेटर बनला आहे. कोहलीने गेल्या दोन वर्षात एकही शतक झळकावले नसले तरी इंस्टाग्रामवर त्याने द्विशतक झळकावले आहे.

इंस्टाग्रामवर 200 दशलक्ष फॉलोअर्स असलेला कोहली हा भारतातील पहिला व्यक्ती ठरला आहे. जगभरातील सर्व क्रीडा दिग्गजांच्या फॉलोअर्सची यादी पाहिली तर कोहली यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो त्यानंतर अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आहे. रोनाल्डोचे 451 दशलक्ष (45.1 कोटी) आणि मेस्सीचे 334 दशलक्ष (334 दशलक्ष) चाहते आहेत.

विराटने रचला इतिहास, 'दुहेरी शतक' झळकावल्यानंतर शेअर केला खास व्हिडिओ
R. Ashwin | 'आम्हाला वाटलं हे विमान काही खाली उतरत नाही'

शेअर केला खास व्हिडिओ

इंस्टाग्रामवर 200 मिलियन फॉलोअर्स पूर्ण केल्यानंतर विराटने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष कामगिरी केल्यानंतर त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत. यासाठी कोहलीने बिनशर्त पाठिंबा दिल्याबद्दल त्याच्या चाहत्यांचे आणि फॉलोअर्सचे आभार मानले आहेत. कोहली म्हणाला, '200 मिलियन. सर्व इंस्टा समर्थनासाठी धन्यवाद.' विराटचे फेसबुकवर 49 मिलियन फॉलोअर्स आहेत.

क्रीडा जगतात सर्वाधिक फॉलो केले जाणारे खेळाडू

क्रिस्टियानो रोनाल्डो- 451 मिलियन

लियोनल मेसी- 334 मिलियन

विराट कोहली- 200 मिलियन

नेमान जूनियर- 175 मिलियन

लेब्रॉन जेम्स- 123 मिलियन

इन्स्टाग्रामवरील पोस्टवरून कोहली किती कमावतो?

मिळालेल्या माहितीनुसार, भारताचा माजी कर्णधार कोहली इंस्टाग्राम पोस्टमधून कमाईच्या बाबतीत 19 व्या क्रमांकावर आहे. तो भारतातील इंस्टाग्राम पोस्टमधून सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे. विराट एका पेड इंस्टाग्राम पोस्टसाठी सुमारे $680000 आकारतो. त्याची एकूण संपत्ती सुमारे $127 दशलक्ष म्हणजेच अंदाजे 950 कोटी इतकी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com