Ashes 2019 : ऑस्ट्रेलियाचे 398 धावांचे आव्हान 

वृत्तसंस्था
रविवार, 4 ऑगस्ट 2019

एक वर्षाच्या बंदीनंतर पुनरागमन करणाऱ्या स्टीव स्मिथने दुसऱ्या डावातही झळकाविलेल्या शानदार शतकामुळे ऍशेस मालिकेत पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाला इंग्लंडसमोर 398 धावांचे आव्हान ठेवता आले. 

स्टीव स्मिथचे दुसऱ्या डावातही शतक 
बर्मिंगहॅम - एक वर्षाच्या बंदीनंतर पुनरागमन करणाऱ्या स्टीव स्मिथने दुसऱ्या डावातही झळकाविलेल्या शानदार शतकामुळे ऍशेस मालिकेत पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाला इंग्लंडसमोर 398 धावांचे आव्हान ठेवता आले. 

स्मिथने सलग दुसऱ्या डावात झळकावलेले शतक आणि पाठोपाठ मॅथू वेडने देखील केलेली जिगरबाज शतकी खेळी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाचे वैशिष्ट्य ठरली. स्मिथने ऑस्ट्रेलियाचे आव्हान भक्कम करताना प्रथम ट्राविस हेडच्या (51) साथीत चौथ्या विकेटसाठी 130 आणि मॅथ्यू वेडच्या साथीत पाचव्या विकेटसाठी 126 धावांची भागीदारी केली. स्मिथ 142 धावांवर बाद झाल्यावर वेडने कर्णधार पेन आणि जेम्स पॅटिन्सन यांना साथीला घेत ऑस्ट्रेलियाचे आव्हान भक्कम केले. वेडने 110 धावांची खेळी केली. ऑस्ठ्रेलियाने दुसरा डाव 7 बाद 487 धावसंख्येवर घोषित केला. 

त्यानंतर विजयासाठी 398 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने 7 षटकांत नाबाद 13 धावा केल्या. उद्या सामन्याचा अखेरचा दिवस असून इंग्लंडला विजयासाठी अजून 385 धावांची गरज आहे. 

संक्षिप्त धावफलक 
ऑस्ट्रेलिया 284 आणि 7 बाद 487 घोषित (स्मिथ 142, मॅथ्यू वेड 110, हेड 51, पॅटिन्सन नाबाद 47, पेन 34, ख्वाजा 40, कमिन्स नाबाद 26, स्टोक्‍स 3-85, मोईन अली 2-130) वि. इंग्लंड 374 आणि बिनबाद 13 (बर्न्स खेळत आहे 7, रॉय खेळत आहे 6)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashes 2019 : Australia 398-run challenge