Video : लढवय्या Jos Buttler च्या खेळीला Hit Wicket चं गालबोट

jos buttler hit wicket
jos buttler hit wicket Sakal

Australia vs England, 2nd Test The Ashes Series : ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या अ‍ॅशेस मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून मालिकेवर मजबूत पकड मिळवली आहे. अ‍ॅडलेडच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 275 धावांनी विजय नोंदवत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी 468 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव 192 धावांत आटोपला.

Ashes Series कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातील पाचव्या आणि अखेरच्या दिवशी इंग्लंडच्या संघाला अनुभवी फलंदाज जोस बटलरकडून (Jos Buttler) आशा होत्या. त्याने मैदानात तग धरुन सामना अनिर्णित राखण्याचा प्रयत्न केला. त्याने 207 चेंडू खेळून संघर्षमय खेळी केली. पण स्वत:च्या चुकीनं त्याने विकेट फेकली. बाद झाल्यानंतर तो स्वत: आश्चर्यचकित झाल्याचे पाहायला मिळाले.

यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने (Jos Buttler) 207 चेंडूत 26 धावा केल्या. हिट विकेटच्या रुपात बाद होऊन तो तंबूत परतला. त्याच्या हिट विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इंग्लंडच्या डावातील 110 व्या षटकात रिचर्डसन गोलंदाजीला आला. त्याने टाकलेला चेंडू बटलरने बॅकफूटवर जाऊन खेळलाही. पण त्याला क्रिजचा अंदाज लागला नाही. चेंडू मारण्यासाठी तो मागे गेला आणि त्याचा डावा पाय स्टंपला लागला. त्यामुळे त्याच्या संघर्षमयी खेळीला ब्रेक लागला.

ऑस्ट्रेलियाची मालिकेत 2-0 अशी आघाडी

ऑस्ट्रेलियाने अ‍ॅडलेड टेस्टमध्ये पहिला डाव 473 धावांवर घोषित केला होता. कांगारुंनी पाहुण्या इंग्लंडचा पहिला डाव 236 धावांत आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला फॉलोऑन न देता दुसऱ्यांदा बॅटिंग करणं पसंत केले. दुसऱ्या डावात 9 बाद 230 धावा करुन त्यांनी इंग्लंडसमोर 468 धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव 192 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेने (Marnus Labuschagne) याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याने पहिल्या डावात 103 तर दुसऱ्या डावात 51 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.

ब्रिस्बेनमधील गाबाच्या मैदानात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यातही इंग्लंडवर पराभवाची नामुष्की ओढावली होती. हा सामना यजमान ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सनी जिंकला होता. इंग्लंडचा संघ सुरुवातीपासूनच या मालिकेत संघर्ष करताना दिसत आहे. आता मालिका वाचवण्यासाठी त्यांना किमान दोन कसोटी सामने जिंकावे लागणार आहेत. मागील 11 वर्षांत इंग्लंडला ऑस्ट्रेलिया साधा एक कसोटी सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे कसोटी मालिका वाचवण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर असेल. या दोन्ही संघातील तिसरा बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रंगणार आहे. या सामन्यात इंग्लंडला पराभवाचा पाहुणचार देत ऑस्ट्रेलियन संघ मालिका विजय निश्चित करण्यासाठीच मैदानात उतरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com