
AUS vs ENG : प्रतिष्ठा पणाला अन् इंग्लंडचे ये रे माझ्या मागल्या
Ashes 2021 Australia vs England 3rd Test Day 1 : मेलबर्नच्या मैदानात सुरु असलेल्या तिसऱ्या आणि करो वा मरोच्या लढतीतही इंग्लंडचे बारा वाजले आहेत. टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंड पहिला डाव अवघ्या 185 धावांत आटोपला आहे. इंग्लंडकडून जो रुटचं अर्धशतक बेयरस्ट्रोनं केलेल्या 35 धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. जो रुटने 82 चेंडूत 4 चौकाराच्या मदतीने 50 धावा केल्या. बेयरस्टोने 75 चेंडूचा सामना करताना 3 चौकाराच्या मदतीने 35 धावा केल्या. या दोघांशिवाय बेन स्टोक्स 60 चेंडूत 25 धावा, ओली रॉबिन्सन 26 चेंडूत 22 धावा, मलानच्या 14 आणि झॅक क्राउल्वेच्या 12 धावा, जॅक लीचच्या 13 धावा वगळता अन्य एकाही फलंदालाजा दुहेरी आकडा पार करता आला नाही.
ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सनं 15 षटकात दोन निर्धाव षटकासह 36 धावा खर्च करुन सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. दुसऱ्या बाजूला फिरकीपटू लायननेही इंग्लंडच्या फलंदाजांची फिरकी घेतली. त्याने 14.1 षटकात 36 धावा खर्च करत 3 विकेट घेतल्या. स्टार्कने दोन तर बोलंड आणि ग्रीन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली असून इंग्लंडला ओव्हर टेक करुन मोठी आघाडी घेण्यासाठी ते पर्यत्नशील असतील.
Web Title: Ashes 2021 Australia Vs England 3rd Test Day 1 Lyon Cummins Fire England All Out 185
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..