ॲशेस मालिकेचा थरार १६ जूनपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashes series

ॲशेस मालिकेचा थरार १६ जूनपासून

लंडन : महिला आणि पुरुषांच्या ॲशेस मालिकेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली असून पुरुषांच्या ॲशेस मालिकेत १६ जून ते ३१ जुलै (२०२३) दरम्यान ५ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. तसेच महिलांच्या ॲशेस मालिकेत एकच कसोटी सामना होणार असून; ३ ट्वेन्टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांचा समावेश करण्यात आला आहे.

मागच्या ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या महिला आणि पुरुष संघाने एकही सामना गमावला नव्हता. पुरुषांच्या संघाने ५ सामन्यांची ॲशेस मालिका ४-० अशी जिंकली; तर महिला संघाने मागच्यावेळी खेळली गेलेली एकमेव कसोटी अनिर्णित राखली होती. शिवाय ३ ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका १-० आणि ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका ३-० अशी जिंकली होती.

गेल्या १३९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये ऑगस्ट महिन्यात एकही कसोटी खेळवली जाणार नाही. २०२३ च्या ॲशेस मालिकेची घोषणा करण्यात आल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले म्हणाले, ‘‘ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान खेळवण्यात येणारी ॲशेस मालिका ही जगातील सर्वात महत्त्वाच्या आणि कठीण कसोटी मालिकेमधील एक मालिका असून; ॲशेस खेळताना नेहमीच खेळाडूंचा कस लागत असतो. देशाबाहेर ॲशेस जिंकणे हे नेहमीच आव्हानात्मक असते आणि हे आव्हान झेलण्यास आम्ही समर्थ आहोत, असेही ते म्हणाले.

पुरुषांच्या मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी १६ ते २० जून : एजबॅस्टन, बर्मिंगहॅम

दुसरी कसोटी २८ जून ते २ जुलै : लॉर्डस्, लंडन

तिसरी कसोटी ६ जुलै ते १० जुलै : हेडिंगले, लीडस्

चौथी कसोटी १९ जुलै ते २३ जुलै : ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

पाचवी कसोटी २७ जुलै ते ३१ जुलै : द ओव्हल, लंडन

महिलांच्या मालिकेचे वेळापत्रक

कसोटी २२ ते २६ जून :

ट्रेंट ब्रीज,नॉटिंगहॅम.

पहिला ट्वेन्टी-२० सामना १ जुलै : एजबॅस्टन, बर्मिंगहॅम

दुसरा ट्वेन्टी-२० सामना ५ जुलै :

द ओव्हल, लंडन

तिसरा ट्वेन्टी-२० सामना ८ जुलै : लॉर्ड्स, लंडन

पहिला वन डे सामना १२ जुलै : काउंटी ग्राउंड, ब्रिस्टॉल

दुसरा वन डे सामना १६ जुलै :

द एजेस बाउल, साउथॅम्प्टन

तिसरा वन डे सामना १८ जुलै : काउंटी ग्राउंड, टॉटन.

Web Title: Ashes Cup Australia Vs England Will Start From 16 June 2023 Edgbaston Full Details Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..