Ashes Test Series
Ashes Test Seriesesakal

Ashes : ख्वाजाने संधीचे सोने केले; कांगारु ४०० पार

सिडनी : अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes Test Series) चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी उस्मान ख्वाजाने (Usman Khawaja) दमदार शतक ठोकत मिळालेल्या संधीचे सोने केले. ख्वाजाने केलेल्या १३७ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४०० धावा पार केल्या. ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव ८ बाद ४१७ धावांवर घोषित केला.

अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटीचा पहिल्या दिवशी पावसामुळे ४६ षटकांचाच खेळ झाला. होता. त्यातही इंग्लंडच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवत कांगारुंना एका पाठोपाठ एक धक्के दिले. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या ३ बाद १२६ धावा झाल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि हेडच्या जागी संधी मिळालेल्या उस्मान ख्वाजा क्रिजवर नाबाद होते.

दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा (Australia Cricket Team) डाव सावरुन महत्वपूर्ण भागीदारी करण्याची जबाबदारी या दोघांवर होती. या दोघांनी दुसऱ्या दिवसाची सुरुवात चांगली केली. स्टीव्ह स्मिथने अर्धशतकी खेळी करत ख्वाजा बरोबर भागीदारी रचली आणि कांगारुंना २०० च्या पार पोहचवले. मात्र स्मिथ ६७ धावा करुन बाद झाला.

त्यानंतर ख्वाजाने (Usman Khawaja) डावाची सुत्रे हातात घेत ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येकडे घेऊन गेला. टॅव्हिस हेड कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे त्याच्या जागी उस्मान ख्वाजाला संधी मिळाली होती. मुळचा सलामीवीर असलेल्या ख्वाजाने मधल्या फळीत फलंदाजी करत आपली उपयुक्तता सिद्ध करुन दाखवली. त्याच्या १३७ धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलिया ४०० पार गेला.

इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) चांगला मारा करत कांगारुंचा निम्मा संघ गारद केला. मात्र यासाठी त्याने १०१ धावा खर्चिल्या. अखेर ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव ८ बाद ४१७ धावांवर घोषित केला. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात बिनबाद १३ धावा केल्या होत्या.

  • दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडच्या पहिल्या डावात बिनबाद १३ धावा

  • ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव ४१७ धावांवर केला घोषित

  • 398-8 उस्मान ख्वाजाची १३७ धावांची शतकी खेळी आली संपुष्टात

  • 110.4 : उस्मान ख्वाजाचे सातवे कसोटी शतक, संधीचे सोने करत संघाला अडचणीतून काढले बाहेर

  • 91.2 : ऑस्ट्रेलियाने पार केला २५० चा टप्पा

  • 242-5 : कांगारुंचा निम्मा संघ माघारी, ब्रॉडने कॅमेरुन ग्रीनला ५ धावांवर केले बाद

  • 85.6 : उस्मान ख्वाजाचे अर्धशतक पूर्ण

  • 232-4 : लंचनंतर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, स्टीव्ह स्मिथ ६७ धावांवर बाद

  • 77.4 : स्टीव स्मिथचे दमदार अर्धशतक, ऑस्ट्रेलिया २०० पार

  • स्मिथ, ख्वाजाकडून दुसऱ्या दिवशीची चांगली सुरुवात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com