Ashes AUSvsENG : कांगारुंनी इंग्लंडला स्वस्तात गुंडाळले

AUSvsENG : इंग्लंडचा पहिला डाव 147 धावात संपुष्टात
pat cummins
pat cumminsesakal

ब्रिसबेन : अॅशस मालिकेतील (Ashes Series) पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव 147 धावात संपवला. कांगारुंचा कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) आपल्या कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात पाच विकेट घेण्याची किमया केली.

आजपासून ब्रिसबेनच्या गाबा स्टेडियमवर (Gabba Test) सुरु झाली. पहिल्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. (AUS vs ENG) इंग्लंडने आपला हुकमी एक्का जेम्स अँडरसनला पहिल्या कसोटीत विश्रांती दिली. ( Ashes Series AUS vs ENG 1st Test Gabba Live Update Score)

मिशेल स्टार्कने (Mitchell Starc) सामन्याच्या पहिल्याच चेेंडूवर बर्न्सचा त्रिफळा उडवत धडाकेबाज सुरुवात केली. त्यानंतर कांगारुंच्या गोलंदाजांनी एका पाठोपाठ एक धक्के देत इंग्लंडचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय उलटा पाडला. कांगारुंच्या तोफखान्याने इंग्लंडचा संपूर्ण संघ 147 धावात तंबूत धाडला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या तर जॉश हेजलवूड आणि मिशेल स्टार्कने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. कॅमेरोन ग्रीननेही 1 विकेट घेत चांगली साथ दिली.

इंग्लंडकडून जोस बटलरने (Jos Buttler) सर्वाधिक 39 धावा केल्या तर ओली पोपने 35 धावा करत बटलरसोबत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला.

गाबावरील इंग्लंडचा कसोटी इतिहास पाहिला तर त्यांना १९८६ पासून या मैदानावर एकही कसोटी जिंकता आलेली नाही. हा इतिहास यंदा इंग्लंड बदलणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (AUS vs ENG Ashes Series)

मिशेल स्टार्कने पहिल्याच चेंडूवर धमाका केला. याचा व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या हाय व्होल्टेज घडामोडी :

सामन्यात पावसाचा व्यत्यय, पहिल्या दिवसाचा खेळ संपला.

कर्णधार पॅट कमिन्सचा भेदक मारा; इंग्लंडला 147 धावात गुंडाळला.

ख्रिस वोक्सची फटकेबाजी इंग्लंड 150 च्या जवळ पोहचला

कर्णधार पॅट कमिन्सचा इंग्लंडला अजून एक धक्का, रॉबिन्सन भोपळाही न फोडता माघारी

ग्रीनने 35 धावांवर खेळणाऱ्या पोपला धाडले तंबूत, इंग्लंडच्या 7 बाद 118 धावा

स्टार्कचा पुन्हा इंग्लंडला धक्का, बटलर 39 धावा करुन बाद

बटलर आणि ओली पोप यांच्याकडून इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न, इंग्लंडची शंभरी पार

हासीब हामीद २५ धावा करुन बाद; अवघ्या ६० धावांवर इंग्लंडचा निम्मा संघ माघारी

पुनरागमन करणाऱ्या बेन स्टेक्सकडून निराशा, ५ धावांची भर घालून माघारी

हेजलवूडने इंग्लंडचा मोठा मासा लावला गळाला, कर्णधार जो रुट भोपळाही न फोडता माघारी

हेजलवूडने इंग्लंडला दिला दुसरा धक्का, डेव्हिड मलान ६ धावा करुन माघारी

पहिल्याच चेंडूवर स्टार्कने उडवला रोरी बर्न्सचा त्रिफळा

इंग्लंडचा नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com