इंग्लंडचा सपोर्ट स्टाफ गायब; सवंगडीच झाले एकमेकांचे कोच | Ashes Test | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

England Cricket Team

इंग्लंडचा सपोर्ट स्टाफ गायब; सवंगडीच झाले एकमेकांचे कोच

Chris Silverwood: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील (The Ashes) मालिका कोरोनाच्या विळख्यात अडकण्याची भिती निर्माण झाली. सिडनीमध्ये दोन्ही संघात रंगणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी (Australia vs England, 4th Test) पाहुण्या इंग्लंड संघाचे मुख्य कोच क्रिस सिल्वरवुड (Chris Silverwood) यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून ते 8 जानेवारीपर्यंत संघापासून दूर असतील. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने यावृत्ताची पुष्टी केली आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने एका निवेदनाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिलीये. सिल्वरवुड यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यात सौम्य लक्षणं आढळली असून 8 जानेवारीपर्यंत ते क्वारंटाईन असतील. त्यांनी कोरोना प्रतिबंधक दोन्ही डोस घेतल्याचा उल्लेखही इंग्लंड क्रिकेट बोर्डाने केलाय. पाचव्या कसोटीसाठी ते संघासोबत असतील, असा विश्वासही बोर्डाने व्यक्त केलाय.

हेही वाचा: शतकी दुष्काळातही कोहलीला 'विराट' विक्रमाची संधी

इंग्लंडच्या संघावर संकटावर संकटे

ऑस्ट्रेलियात फ्लॉप शो सुरु असताना इंग्लंडच्या संघाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. बॉलिंग कोट जॉन लुईस, स्पिन मेंटर जीतन पटेल आणि कंडीशनिंग सल्लागार डेरेन वेनेस ही मंडळी देखील क्वारंटाईनमध्ये आहेत. यापार्श्वभूमीवर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने एडम हॉलिओक कोचिंगसाठी संघासोबत असतील, अशी घोषणाही केली होती. पण तेही कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने संघासोबत जोडले गेलेले नाहीत.

इंग्लंडचा संपूर्ण स्टाफ गायब असून खेळाडूच एकमेकांची मदत करत आहेत. आम्ही या सर्व परिस्थितीवर मात करुन उर्वरित दोन कसोटी सामन्यात दमदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहोत, असे इंग्लंडचा फलंदाज जॅक क्राउलीनं म्हटलं आहे.

हेही वाचा: WWE स्टार Roman Reigns ला कोरोना; बहुचर्चित फाईट झाली रद्द

हेड-मॅग्राही कोरानाचे शिकार

ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेड याचा देखील कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तो सिडनी कसोटीला मुकणार आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्रेन मॅग्राही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. जग हळूहळू सावरत असताना पुन्हा एकदा क्रीडा जगतात कोरोना डोकावताना दिसतोय.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top