Ashes Series Ollie Robinson : ICC चा अजब न्याय; शिव्या देणारा रॉबिन्सन मोकाट अन् औषध लावणारा मोईन गुन्हेगार?

Ashes Series Ollie Robinson Moeen Ali
Ashes Series Ollie Robinson Moeen Ali esakal

Ashes Series Ollie Robinson Moeen Ali : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाला बाद केल्यानंतर त्याला शिवीगाळ केली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. क्रिकेट वर्तुळात याची जोरदार चर्चा देखील झाली. मात्र सामना झाल्यानंतर आयसीसीने रॉबिन्सनला फक्त ताकीद देऊन सोडून दिले.

Ashes Series Ollie Robinson Moeen Ali
Shane Warne Death : डॉक्टरांचा दावा; शेन वॉर्नचा मृत्यू कोरोना लसीमुळे?

दुसरीकडे भरपूर षटके टाकल्यामुळे इंग्लंडच्या मोईन अलीच्या बोटाला इजा झाली होती. यावर त्याने औषधचा स्प्रे मारला. मात्र स्प्रे मारताना त्याने पंचांची परवानगी घेतली नाही. यामुळे आयसीसीने त्याच्या सामन्याच्या मानधनातील 25 टक्के रक्कम दंड म्हणून भरण्याची शिक्षा ठोठावली आहे.

याचबरोबर आयसीसीने स्लो ओव्हर रेटसाठी दोन्ही संघांतील खेळाडूंना सामन्याच्या मानधनातील 40 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.

Ashes Series Ollie Robinson Moeen Ali
Asia Cup 2023: पलटीराम पाकिस्तानची पुन्हा पलटी, आशिया कपच्या हायब्रिड मॉडेलवर युटर्न, हे आहे कारण

दरम्यान, रॉबिन्सनने ज्या उस्मान ख्वाजाला शिवीगाळ केली त्याने याबाबत अजब प्रतिक्रिया दिली. उस्मान ख्वाजा म्हणाला की, 'त्या दिवशी स्टेडियममध्ये गर्दी खूप होती. त्यामुळे मला काही कळाले नाही. काही ऐकायला आले नाही. हा थोडा मैत्रीपूर्ण विनोद असेल. बऱ्याचवेळा हा खेळ चांगल्या खेळभावनेने खेळला जातो.'

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या आचार संहितेतील कलम 2.5 नुसार कोणत्याही प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिबंध लावते. यात फलंदाजाला बाद केल्यानंतर मौखिक स्वरूपात शिवी देण्याचा देखील समावेश आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com