
Video: कमिन्सने ख्वाजासाठी ऑस्ट्रेलियाचे सेलिब्रेशन रोखले
हॉबर्ट : अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ४ - ० असा दणदणीत विजय मिळवून अॅशेस (Ashes Series) पुन्हा आपल्याकडे राखल्या. ऑस्ट्रेलियाने (Australia Cricket Team) हॉबर्टवरील दिवस रात्र कसोटी तिसऱ्याच दिवशी इंग्लंडचा १४६ धावांनी पराभव केला. यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ मालिका विजयाचे सेलिब्रेशन (Australia Ashes Celebration) करण्यासाठी व्यासपीठावर गेला. मात्र या व्यासपीठावर उस्मान ख्वाजा (Usman Khwaja) नव्हता. हे पाहून कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) आपल्या संघाचे सेलिब्रेशन रोखले आणि उस्मान ख्वाजाला व्यासपीठावर बोलवून घेतले. पॅट कमिन्सच्या या कृतीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. या बाबतचा व्हिडिओ सध्या व्हयरल होत आहे.
हेही वाचा: VIDEO : पॅट कमिन्सनं जाळ विणलं अन् रुट त्यात फसला!
ज्यावेळी ऑस्ट्रेलिया संघाला अॅशेसची ट्रॉफी देण्यात आली त्यावेळी ऑस्ट्रेलियन खेळाडू शँपेनची बॉटल उघडून सेलिब्रेशन करण्याच्या बेतात होते. या दरम्यान, चौथ्या कसोटीत संघात समाविष्ट करण्यात आलेला उस्मान ख्वाजा व्यासपीठाच्या खाली संघापासून दूर उभा होता. पॅट कमिन्सला हे समजल्यानंतर त्याने त्वरित शँपेन सेलिब्रेशन (champagne Celebration) रोखले आणि उस्मान ख्वाजाला वर बोलवून घेत संघाच्या जल्लोषात सामिल करुन घेतले. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पॅट कमिन्सच्या या कृतीचे सर्वांकडूनच कौतुक होत आहे.
हेही वाचा: आता कसोटीत पंतला कॅप्टन करा; दिग्गजाचा सल्ला
उस्मान ख्वाजाला पाचव्या कसोटीत जरी मोठी खेळी करण्यात यश आले नसले तरी त्याने चौथ्या कसोटीत दोन्ही डावात शतक ठोकले होते. जवळपास अडीच वर्षांनी उस्मान ख्वाजाला संघात स्थान मिळाले होते. ट्रॅव्हिस हेडला कोरोनाची लागण झाल्याने तो चौथ्या कसोटीला मुकला होता. त्याच्या जागी उस्मान ख्वाजाला संघात घेण्यात आले होते.
Web Title: Ashes Test Series Pat Cummins Stop Champagne Celebration For Usman Khwaja Video Gone Viral
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..