CAC : अशोक मल्होत्रा, जतीन परांजपेंची BCCI क्रिकेट सल्लागार समितीवर निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BCCI Cricket Advisory Committee

CAC : अशोक मल्होत्रा, जतीन परांजपेंची BCCI क्रिकेट सल्लागार समितीवर निवड

BCCI Cricket Advisory Committee : बीसीसीआने नुकतेच आपल्या क्रिकेट सल्लागार समितीची निवड केली आहे. या समितीत भारताचे माजी खेळाडू अशोक मल्होत्रा आणि जतीन परांजपे यांची नियुक्ती केली आहे. या समितीवर भारताच्या वरिष्ठ पुरूष संघाच्या निवडसमिती सदस्यांची नियुक्ती करण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.

हेही वाचा: Steve Smith Record : स्मिथ नामक वादळ! सर डॉन ब्रॅडमन यांची बरोबरी तर आता रोहित रडारवर

बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीत अशोक मल्होत्रा आणि जतीन परांजपे यांच्या व्यतिरिक्त सुलक्षणा नाईक यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयने ही घोषणा प्रसिद्धीपत्रकाद्वारे आज (दि. 1 डिसेंबर) रोजी केली. अशोक मल्होत्रा यांनी इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ नुकताच पूर्ण केला. तर जतीन परांजपे हे भारताच्या वरिष्ठ पुरूष संघाच्या निवडसमितीमधील एक सदस्य होते.

हेही वाचा: Virat Kohli: विराटनं सिक्स मारले याचे दु:ख नाही, पण पांड्यानं... पाकिस्तानी बॉलर हारिस रऊस बोलून गेला

सुलक्षणा नाईक या मदन लाल यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समितीमधील एक सदस्या आहेत. नव्या तीन सदस्यांच्या क्रिकेट सल्लागार समितीतील अशोक मल्होत्रा यांनी 7 कसोटी आणि 20 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तर जतीन परांजपे यांनी भारताकडून 4 वनडे सामने खेळले आहेत.

सुलक्षणा नाईक यांनी आपल्या 11 वर्षाच्या कारकिर्दित भारतीय महिला क्रिकेट संघाकडून 2 कसोटी 46 वनडे आणि 31 टी 20 सामने खेळले आहेत.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

टॅग्स :CricketBCCI