Pro Kabaddi League : पुणेरी पलटण - दबंग दिल्ली लढत सुटली बरोबरीत, आशू मलिकचे सर्वाधिक १७ गुण

PKL 2024 : पुणेरी पलटणला प्रो-कबड्डीच्या ११व्या पर्वात मंगळवारी दबंग दिल्लीवर १२ गुणांची आघाडी टिकवता आली नाही.
Pro Kabaddi
Pro Kabaddiesakal
Updated on

नोएडा, ता. १२: कर्णधार अस्लम इनामदारच्या गैरहजेरीत चढाईच्या आघाडीवर अपयशी ठरलेल्या पुणेरी पलटणला प्रो-कबड्डीच्या ११व्या पर्वात मंगळवारी दबंग दिल्लीवर १२ गुणांची आघाडी टिकवता आली नाही.

आशू मलिकच्या तुफानी चढायांनी एकवेळ भक्कम असलेला पुणेरी पलटणचा बचावही फिका पडला आणि सामना नाट्यमय कलाटणी घेत ३८-३८ असा बरोबरीत राहिला. पायाच्या दुखापतीमुळे अस्लम इनामदार उर्वरित लीगमध्ये खेळू शकणार नाही. याचा फटका पुणेरी पलटणला निश्चित बसला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com