Asia Cup 2022 : शाहीनच्या अनुपस्थितीवर बाबर आझम म्हणाला, जर तो असता तर...

Asia Cup 2022 Babar Azam Comment On Shaheen Afridi Missing India Vs Pakistan Match
Asia Cup 2022 Babar Azam Comment On Shaheen Afridi Missing India Vs Pakistan Matchesakal

Asia Cup 2022 India Vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्यापूर्वीच पाकिस्तानला मोठा धक्का बसला. वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) दुखापतीमुळे आशिया कपला मुकला. गतवर्षीच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सनी पराभव केला होता. त्यावेळी शाहीन आफ्रिदीने चांगला मारा करत भारताची टॉप ऑर्डर उडवली होती. आता 28 ऑगस्ट रोजी होणाऱ्या भारताविरूद्धच्या सामन्यात शाहीन आफ्रिदी पाकिस्तान संघात असणार नाही. याबाबत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) प्रतिक्रिया दिली.

Asia Cup 2022 Babar Azam Comment On Shaheen Afridi Missing India Vs Pakistan Match
VIDEO | Yuzvendra Chahal : युझवेंद्र - धनश्री ब्रेकअप प्रकरणात कर्णधार रोहितची उडी

बाबर आझम म्हणाला की, 'शाहीन हा एक चांगला गोलंदाज आहे. तो आक्रमकपणे गोलंदाजी करतो आणि गोलंदाजी विभागाचं नेतृत्व करतो त्यामुळे आम्हाला त्याची कमतरता जाणवणार. जर शाहीन असता तर हा सामना एका वेगळ्याच स्तरावर गेला असता. मात्र आमचे इतरही गोलंदाज चांगले आहेत. संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास चांगला आहे.'

भारताविरूद्धच्या सामन्याबाबत बाबर आझम म्हणाला, 'वातावरण तापलेले वगेरे नाही. ही काही सामन्या परिस्थिती नाही. मात्र एक व्यावसायिक खेळाडू म्हणून तुम्हाला सर्व परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. माझ्या दृष्टीने कर्णधार म्हणून प्रत्येक सामना महत्वाचा आहे. आमचे 100 टक्के देणे हे आमचे काम आहे. आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. टी 20 वर्ल्डकप संपला आहे. उद्याचा दिवस नवा असणार आहे. तुम्हाला आत्मविश्वास असला पाहिजे.'

Asia Cup 2022 Babar Azam Comment On Shaheen Afridi Missing India Vs Pakistan Match
Virat Kohli : 'मानसिकदृष्ट्या खचलो होतो मात्र दाखवून द्यायचो नाही'

बाबर आझमला भारत - पाकिस्तानचे खेळाडू एकमेकांशी संवाद साधताना दिसले याबाबत विचारले असता त्याने 'एक खेळाडू म्हणून तुम्ही वेगवेगळ्या खेळाडूंना भेटत असता. आम्ही सर्वच खेळाडूंना भेटतो. हे सामान्य आहे. आम्ही खेळाडूंशी क्रिकेट आणि इतर गोष्टींबद्दल बोलत असतो. सर्वजण भारत पाकिस्तान सामन्याची वाट पाहत आहेत. आमची बेंच स्ट्रेंथ ही तगडी आहे. दुखापती काय होतचं असतात. तो एक खेळाचा भाग आहे. माझा सर्व खेळाडूंवर विश्वास आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com