IND vs PAK: हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी संघात बदल होणार... - राहुल द्रविड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Dravid Asia Cup IND vs PAK

IND vs PAK: हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी संघात बदल होणार... - राहुल द्रविड

Playing-11 India vs Pakistan Asia Cup 2022 : भारतीय संघ रविवारी पुन्हा एकदा पाकिस्तानशी भिडणार आहे. या सुपर-4 सामन्यासाठी टीम इंडिया पूर्णपणे तयार आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी शनिवारी सामन्याच्या आधी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्याने प्लेइंग-11 बद्दल मोठे अपडेट दिले आहे. आवेश खानची प्रकृती सध्या बरी नसल्याने त्यांनी सराव केला नाही द्रविडने सांगितले आहे. स्पर्धेतील पुढील सामन्यांसाठी तो वेळेत बरा होईल अशी अपेक्षा आहे. रविचंद्रन अश्विनचा पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 सामन्यात समावेश केला जाऊ शकतो, असे संकेत द्रविडने दिले आहेत.

हेही वाचा: Ravindra Jadeja : जडेजा टी 20 वर्ल्डकपला मुकणार? राहुल द्रविड स्पष्टच बोलला...

जडेजा अद्याप विश्वचषक संघातून बाहेर नाही

पत्रकार परिषदेत राहुल द्रविड म्हणाला - रवींद्र जडेजाचा गुडघा दुखत आहे. तो आशिया कपमधून बाहेर पडला आहे. जडेजा वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. विश्वचषक अजून दूर आहे आणि आम्ही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही. तो बाहेर आहे की खेळणार हे आम्ही आत्ताच सांगू शकत नाही. पुढे ते कसे होते ते पाहू, त्यानंतरच निर्णय घेऊ.

विराट कोहलीच्या कामगिरीवर द्रविड खूश

राहुल द्रविड विराट कोहलीबाबत वक्तव्य करत म्हणाला - विराट कोहलीचे आकडे पाहून लोक थोडे गोंधळले आहेत. त्याचे छोटे योगदान संघासाठी खूप मोठे आहे. मला आशा आहे की तो हा चांगला फॉर्म कायम ठेवेल. विराट कोहलीच्या कामगिरीवर मी खूश आहे. त्याला पुन्हा परत आल्याचे पाहून आनंद झाला.

हेही वाचा: IND vs PAK : वर्चस्व कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; आज भारत-पाक सामना

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या तयारीबाबत द्रविड म्हणाला- आम्ही चांगली तयारी केली आहे. आम्ही सर्वोत्तम संभाव्य संघासह येथे आहोत. मात्र काही खेळाडूंना दुखापत झाली आहे. यावर आमचे नियंत्रण नाही. आशिया चषक जिंकण्यासाठी आम्ही एकावेळी एकाच सामन्याचे धोरण अवलंबत आहोत. आम्ही फक्त एका सामन्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. विश्वचषकाच्या दिशेने वाटचाल करताना आम्हाला सर्वोत्तम संघाला संधी देण्याची गरज आहे.

Web Title: Asia Cup 2022 Ind Vs Pak Team India Confirm Change Playing 11 Before India Vs Pakistan Super 4 Match Rahul Dravid Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..