Asia Cup 2022: गेल्या 20 वर्षात Ind-Pak मध्ये 59 सामने झाले, जाणून घ्या कोण ठरला 'बाप'

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या 20 वर्षात बाप कोण?
Asia Cup 2022 Ind-Pak
Asia Cup 2022 Ind-Paksakal

Asia Cup 2022 Ind-Pak : आशिया कप 27 ऑगस्टपासून UAE मध्ये सुरू झाले आहे. आशिया कपच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा 8 विकेट्स राखून पराभव केला. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात 28 ऑगस्टला सामना होणार आहे. विश्वकरंडक असो वा आशिया करंडक भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल दोन्ही देशांचे चाहते खूप उत्सुक असतात. गेल्या 1 वर्षापासून चाहते या शानदार सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 8 व्यांदा आशिया कप जिंकण्याच्या इराद्याने उतरणार आहे.

Asia Cup 2022 Ind-Pak
Asia Cup 2022 : Ind vs Pak चा नवा अध्याय; आजच्या लढतीवर क्रिकेटविश्वाचे लक्ष

'Asia Cup'मध्ये भारत आणि पाकिस्तान

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये एकूण 14 सामने खेळला आहे. यापैकी भारताने 8 सामने जिंकले, तर पाकिस्तानने फक्त 5 सामने जिंकले आहेत. 1997 मध्ये दोन्ही देशांमधला सामना ड्रॉ झाला होता.

'World Cup'मध्ये भारत आणि पाकिस्तान

'वर्ल्ड कप'मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने 11 सामने जिंकले असून पाकिस्तानने केवळ एकच सामना जिंकला आहे. तर 1 सामना अनिर्णित राहिला.

पाकिस्तानला आतापर्यंत 'एकदिवसीय विश्वचषक'मध्ये भारताला पराभूत करता आलेले नाही. भारताने सर्व 7 सामने जिंकले आहेत. तर 'T20 वर्ल्ड कप'मध्ये भारताने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने केवळ 1 सामना जिंकला आहे. तर 1 सामना अनिर्णित राहिला.

Asia Cup 2022 Ind-Pak
Anushka-Virat: 'हिरोईनशी लग्न केल्याचा परिणाम'; विराट कोहलीच्या डिप्रेशनवर KRKचं ट्विट

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या 20 वर्षात बाप कोण?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या 20 वर्षांत एकूण 59 सामने खेळले गेले आहेत.

  • 12 कसोटी सामने सामन्यांपैकी भारताने 4 जिंकले आहेत, तर पाकिस्तानने 3 सामने जिंकले आहेत. यादरम्यान ५ कसोटी सामने अनिर्णित राहिले.

  • 48 एकदिवसीय सामने सामन्यांपैकी भारताने 26 सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, पाकिस्तानने 21 सामने जिंकले, तर 1 सामना रद्द झाला.

  • T20 सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर भारताने 9 पैकी 7 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने फक्त 2 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील 1 सामना अनिर्णित राहिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com