Asia Cup 2022 : भारत - पाकिस्तान लढतीत कोणाचं आहे पारडं जड?

Asia Cup 2022 India Vs Pakistan Record India Ahead Of Pakistan In Terms Of Winning
Asia Cup 2022 India Vs Pakistan Record India Ahead Of Pakistan In Terms Of Winning esakal

Asia Cup 2022 : चार वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येत्या 27 ऑगस्टपासून आशिया कपला सुरूवात होत आहे. जरी आशिया कप 27 ऑगस्टला सुरू होत असला तरी सर्वांची नजर 28 ऑगस्टला होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यावर असणार आहे. पाकिस्तानने गेल्याच वर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्येच झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताचा 10 विकेट्सनी पराभन केला होता. वर्ल्डकप इतिहासातील हा भारताचा पाकिस्तानकडून झालेला पहिला पराभव होता. आता आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांची टशन कशी आहे हे पाहूयात. (India Vs Pakistan Record India In Asia Cup)

Asia Cup 2022 India Vs Pakistan Record India Ahead Of Pakistan In Terms Of Winning
Asia Cup 2022 : लॉर्ड्सवर नाकारले वर्ल्डकप तिकिट अन् आशिया कपच्या जन्माची कहाणी

भारत आणि पाकिस्तान आशिया कपमध्ये एकूण 14 वेळा आमने-सामने आले आहेत. भारताने पाकिस्तानला आशिया कपमध्ये 8 वेळा मात दिली आहे. तर पाकिस्तानला आतापर्यंत भारताचा पाचवेळा पराभव करणे शक्य झाले आहे. 1997 च्या आशिया कपमध्ये झालेल्या भारत पाकिस्तान सामन्याचा निकाल लागला नव्हता. या आकडेवारीवरून आशिया कपमध्ये भारतच बब्बर शेर आहे.

मात्र गेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताचा दुबईतच पराभव केला होता. त्यामुळे पाकिस्तान संघाचे मनोबल वाढले असेल. दुसरीकडे तेव्हाच्या भारतीय टी 20 संघात आणि आताच्या टी 20 संघात बराच फरक झाला आहे. आता संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर आली आहे. त्याचा कॅप्टन म्हणून विजयाचा ट्रॅक रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्यामुळे भारत टी 20 वर्ल्डकपमधील पराभवाचा बदला. त्याच मैदानावर घेण्यासाठी जोर लावले.

Asia Cup 2022 India Vs Pakistan Record India Ahead Of Pakistan In Terms Of Winning
Asia Cup 2022 : रवी शास्त्रींनी Ind vs Pak सामन्याच्या टायमिंगवर केली टीका

भारत - पाकिस्तान सामना म्हटलं की पाकिस्तानची गोलंदाजी आणि भारताची फलंदाजी असा सामना रंगतो. मात्र आशिया कपमधील या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी पाकिस्तानला एक मोठा धक्का बसला. पाकिस्तानचा अव्वल वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे आशिया कपला मुकणार आहे. तसेच भारताच्या गोलंदाजीचा कणा असलेला जसप्रीत बुमराह देखील आशिया कपला मुकला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com