PAK vs HK : Naseem Shah झाला फिट! अशी आहे पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन

Asia Cup 2022 PAK vs HK Naseem Shah Fit Hongkong Won Toss Elected To Bowled First
Asia Cup 2022 PAK vs HK Naseem Shah Fit Hongkong Won Toss Elected To Bowled Firstesakal

Asia Cup 2022 PAK vs HK : आशिया कपमधील ग्रुप A मधील शेवटचा सामना पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात खेळवला जात आहे. या ग्रुपमधून भारत आधीच आपले दोन्ही सामने जिंकून सुपर 4 मध्ये पात्र झाला आहे. आता पाकिस्तानला सुपर 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी हाँगकाँगविरूद्धचा सामना जिंकणे गरजेचे आहे. दरम्यान, हाँगकाँगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने भारताविरूद्ध खेळवलेल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहला (Naseem Shah) भारताविरूद्धच्या सामन्यात क्रॅम्प येत होते. मात्र आजच्या सामन्यातील त्याच्या समावेशामुळे तो फिट झाला असल्याचे दिसून येते.

हाँगकाँगने भारताविरूद्धच्या सामन्यात 193 धावांचा पाठलाग करताना 153 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील हाँगकाँग पाकिस्तानला तगडी फाईट देण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे हाँगकाँगने नाणेफेक जिंकली आहे.

Asia Cup 2022 PAK vs HK Naseem Shah Fit Hongkong Won Toss Elected To Bowled First
US Open 2022 : नाकातून रक्त आलं तरी जिद्दी नदालने जिंकला सामना

नाणेफेक जिंकल्यानंतर हाँगकाँगचा कर्णधार निझाकत खानने आम्ही गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. त्याने आम्ही धावांचा पाठलाग चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यामुळे आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आम्ही आज आमची रणनिती चांगल्या प्रकारे मैदानात अंमलात आणण्याचा प्रयत्न करू. आम्ही हाँगकाँगमध्ये संथ आणि कमी उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवरच खेळतो. शारजातील विकेट देखील अशीच आहे. भारताविरूद्धच्या सामन्यात आम्ही 13 व्या षटकापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती. आज आम्ही चांगल्या रणनितीने मैदानात उतरणार आहोत. मला आशा आहे की आमचे खेळाडू चांगली कामगिरी करतील.

दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम नाणेफेकीनंतर म्हणाला, 'आम्ही प्रथम फलंदाजी करण्यासच प्राधान्य दिलं असतं. आम्ही चांगल्या धावा करून त्यांना दबावात आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही भारताविरूद्धच्या संघात कोणताही बदल केलेला नाही. प्रत्येक सामना नवीन असतो. आम्ही चांगल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू. जसा भारताविरूद्धच्या सामन्यात आमचा आत्मविश्वास होता तसाच आजच्या सामन्यात देखील आहे.'

Asia Cup 2022 PAK vs HK Naseem Shah Fit Hongkong Won Toss Elected To Bowled First
KL Rahul जर असंच खेळला तर भारताची सलामी जोडी नक्की बदलेल : रोहन गावसकर

पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन :

मोहम्मद रिझवान, बाबर आझम, फखर झमान, इफ्तिकार अहमद, खुशदिल शाह, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाझ, हारिस रौऊफ, नसीम शाह, शहानवाज दहानी.

हाँगकाँगची प्लेईंग इलेव्हन :

निझाकत खान, यासिम मुर्तझा, बाबर हयात, किंचित शाह, एझाज खान, झिशान अली. स्कॉट मॅकेनी, हारून अर्शद, एहसान खान, आयुष शुक्ला, मोहम्मद घाझनफार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com