PAK vs AFG : बाबरचं नशिब चांगलं! पुन्हा नाणेफेक जिंकली

PAK vs AFG : बाबरचं नशिब चांगलं! पुन्हा नाणेफेक जिंकली

Asia Cup 2022 Pakistan vs Afghanistan, Super Four : आशिया कप सुपर 4 मध्ये आज पाकिस्तान अफगाणिस्तानशी भिडणार आहे. याच सामन्यावर भारताच्या धुसर का असेना फायनलच्या आशा लागून राहिल्या आहेत. मात्र युएईमध्ये नाणेफेकीचा कौल महत्वाचा असतो. तोच नाणेफेकीचा कौल पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या (Babar Azam) बाजूने लागला आहे. सामना जरी शारजात होत असला तरी सामन्याच्या दुसऱ्या टप्प्यात दव पडण्याची शक्यता असल्याने पाकिस्तानने चेस करण्याचा निर्णय घेतला आहे.

PAK vs AFG : बाबरचं नशिब चांगलं! पुन्हा नाणेफेक जिंकली
ICC T20 Ranking : बाबरला मागे टाकत रिझवान टी 20 चा नवा बादशाह; किंग कोहलीही वधारला

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर बाबर आझम म्हणाला की, 'आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळपट्टी चांगली दिसत आहे. विशेषकरून सामन्याच्या दुसऱ्या टप्प्यात दव पडण्याची शक्यता आहे. म्हणूनच आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आम्ही अफगाणिस्तानच्या लवकर विकेट्स घेऊन त्यांना कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. संघातील वातावरण शांत आहे. आम्ही आमची विजयी घोडदौर कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. विजय कायम तुम्हाला आत्मविश्वास देतो. आम्ही भारताविरूद्धचाच संघ कायम ठेवला आहे त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.'

PAK vs AFG : बाबरचं नशिब चांगलं! पुन्हा नाणेफेक जिंकली
Boycott IPL : धोनी परत ये! राहुल - पंतला नारळ द्या, नेटकरी रोहितच्या नेतृत्वावरही भडकले

नाणेफेक गमावल्यानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी म्हणाला, 'आम्हाला देखील पहिल्यांदा गोलंदाजी करणे आवडले असते. नंतर दव पडण्याची शक्यता आहे. वातावरणात आद्रता देखील जास्त आहे. त्यामुळे सामन्याच्या उत्तरार्धात चेंडू ग्रिप करणे सोपं नाही. मात्र हा खेळाचाच एक भाग आहे. आम्ही मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू. पाकिस्तानविरूद्धचा सामना कायम अटीतटीचा असतो. मात्र गेल्या काही सामन्यात आमची कामगिरी चांगली झाली आहे. आजच्या सामन्यात आम्ही आमच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू. आमच्या संघात दोन बदल आहेत. फरीद मलिक आणि अझमतुल्ला आजचा सामना खेळत आहेत.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com