Asia Cup 2022 : रोहित शर्माची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड, मुंबईतील... - Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma

Asia Cup 2022 : रोहित शर्माची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड, मुंबईतील... - Video

Asia Cup 2022 : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा देशातील सर्वात प्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. मैदानाच्या आत असो किंवा बाहेर या स्टार क्रिकेटरची एक झलक पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागलेली असते. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने 15 ऑगस्टला असेच दृश्य पाहायला मिळाले. रोहितला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी हॉटेलमधून बाहेर पडायचं होतं, पण तो बाहेर येण्यापूर्वीच त्याच्या मुंबईतील हॉटेलबाहेर हजारो लोक रोहितची एक झलक पाहण्यासाठी रस्त्यावर जमले होते. रोहितचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा: IND vs ZIM: झिम्बाब्वेमध्ये भारतीय खेळाडूंना अंघोळ करण्यास बंदी, जाणून घ्या का?

रोहित तिथल्या एका कॅफेमध्ये असल्याचं चाहत्यांना कळलं, त्यानंतर हळूहळू तिथे मोठी गर्दी जमली. काही वेळाने रोहित काही चाहत्यांसमोर आला, मात्र ही गर्दी पाहून तो इतका अस्वस्थ झाला की त्याने निराशेने कपाळाला हात लावला. चाहतेही अनियंत्रित झाले त्यामुळे अखेर रोहित आत गेला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चाहते घोषणाबाजीही करत आहेत. गर्दीमुळे हॉटेलबाहेरचा संपूर्ण रस्ता जाम झाला होता.

भारतीय संघ सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे, पण रोहित त्या संघाचा भाग नाही. रोहित आता थेट आशिया कप 2022 साठी भारतीय संघात सामील होणार आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ 20 ऑगस्ट रोजी यूएईला रवाना होईल, जिथे टीम इंडियाला 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे.

हेही वाचा: Team India : टीम इंडियाच्या राजकारणाचे बळी बनले 'हे' दोन खेळाडू

आशिया कपसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.

Web Title: Asia Cup 2022 Rohit Sharma Fans Go Crazy To Get Glimpse Of Mumbai Restaurant Watch Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..