Asia Cup SL vs AFG : अफगाणिस्तानने सामना 10 षटकातच संपवला

 Asia Cup 2022 Sri Lanka vs Afghanistan 1st Match Group B  Live Cricket Score
Asia Cup 2022 Sri Lanka vs Afghanistan 1st Match Group B Live Cricket ScoreESAKAL

Asia Cup Sri Lanka vs Afghanistan: आशिया कपच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा 8 विकेट्स राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने श्रीलंकेचा डाव 105 धावात संपुष्टात आणला. अफगाणिस्तानकडून फैजलहक फारूकीने 3 विकेट घेतल्या. तर कर्णधार मोहम्मद नबी आणि नजीब उर रेहमानने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. श्रीलंकेचे 106 धावांचे आव्हान अफगाणिस्तानने रेहमानुल्ला गुरबाजने 40 तर हझरतुल्ला झजाईने 37 धावा केल्या. श्रीलंकेकडून भानुका राजपक्षाने 38 तर चमिका करूणारत्नेने 31 धावा केल्या.

Sri Lanka vs Afghanistan Match Update

अफगाणिस्तानने लंकेचे आव्हान केले 10 षटकातच पार

श्रीलंकेने ठेवलेले 106 धावांचे आव्हान अफगाणिस्तानने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 10 षटकात पार केले. अफगाणिस्तानकडून रेहमानुल्ला गुरबाजने 40 तर हझरतुल्ला झजाईने 37 धावा केल्या.

करुणारत्नेची झुंजार खेळी

श्रीलंकेचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत असताना चमिका करूणारत्नेने 31 धावा केल्या. मात्र फारूकीने त्याचा त्रिफळा उडवत श्रीलंकेचा डाव 105 धावांवर संपवला.

75-9 : कर्णधार नबीचा भेदक मारा

श्रीलंकेचा निम्मा संघ 60 धावांवर बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार नबीने अजून दोन धक्के दिले. याचबरोबर श्रीलंकेचे दोन फलंदाज पाठोपाठ धावबाद देखील झाले. भानुका राजपक्षाने झुंजार 38 धावांची खेळी केली. मात्र तो धावबाद झाला.

60-5 : मुजीबने दिला अजून एक धक्का

मुजीबने उर रेहमानने श्रीलंकेला अजून एक धक्का दिला. त्याने 10 व्या षटकात वानिंदू हसरंगाला 2 धावांवर बाद केले.

49-4 : मुजीबने जोडी फोडली

श्रीलंकेची अवस्था 5 धावांवर 3 बाद अशी झाली असताना दनुष्का गुणतिलका आणि भानुका राजपक्षा यांनी चौथ्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी रचली. मात्र मुजीबने गुणतिलकाला 17 धावांवर बाद केले.

5-3 : DRS : वादग्रस्त निर्णय, निसंका बाद 

सामन्याच्या दुसऱ्याच षटकात अफगाणिस्तानच्या नवीन उल हकने श्रीलंकेच्या पिथूम निसंकाला 3 धावांवर बाद केले. पिथूमने झेलबाद निर्णयाविरूद्ध डीआरएस घेत अपिल केले होते. मात्र अल्ट्रा एजने कोणताही स्पाईक न दाखवता देखील अंपायरने फक्त अल्ट्रा एजच्या स्निकोमिटरमधील थोड्याफार हालचालींवर निसंकाला बाद ठरवले.

3-2 : श्रीलंकेला पहिल्याच षटकात पाठोपाठ दोन धक्के

अफगाणिस्तानच्या फैजलहक फारूकीने श्रीलंकेला पहिल्याच षटकात धक्का दिला. त्याने कुसल मेंडिसला 2 धावांवर बाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर चरिथ असलंकाला शुन्यावर बाद करत दुसरा धक्का दिला.

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com